Manipur Election 2022: मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 68.39 टक्के मतदान
Manipur Election 2022: विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान सुरू आहे.
Manipur Election 2022: विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 6,29,276 महिला मतदारांसह एकूण 12,22,713 मतदार 15 महिलांसह 173 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचार्यांचा मोठा ताफा सर्व 38 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 38 जागांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 68.39 टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 5 मार्चला मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, बिप्लब कुमार देब, राष्ट्रीय पीपुल्स पार्टी (एनपीपी) प्रमुख कोनराड के. संगमा, काँग्रेस नेता राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी आपल्या पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख मुद्दे विकास, अतिरेकी, अंमली पदार्थांची तस्करी, सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958 (AFSPA) रद्द करणे, महिला सक्षमीकरण, वाढती बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे होते.
पहिल्या टप्प्यात मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार एन. बिरेन सिंग कॅबिनेट मंत्री थोंगम बिस्वजित सिंग, एनपीपीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री युमनम जॉयकुमार सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते थोकचोम सत्यब्रत सिंग, काँग्रेसचे रतनकुमार सिंग, लोकेश्वर सिंग आणि सरचंद्र सिंग हे निवडणूक रिंगणात आहेत. तसेच जनता दलच्या (युनायटेड) उमेदवार थौनाओजम वृंदा या देखील यास्कुल मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. त्या पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक होत्या.
महत्त्वाच्या बातम्या: