UP Election 2022: विधानसभा निवडणुकीत बसपाचा हत्ती कुठे हरवला? जाणून घ्या युपीत काय आहे पक्षाची स्थिती...
2007 मध्ये उत्तर प्रदेशात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या बहुजन समाजवादी पक्ष (Bahujan Samaj Party) या निवणुकीत चांगली कामगिरी करू शकणार का?
UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आता फक्त दोन टप्प्यांसाठीची मतदान प्रक्रिया शिल्लक राहिली आहे. या दोन टप्प्यांसाठी 3 आणि 7 मार्चला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशातच 2007 मध्ये उत्तर प्रदेशात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या बहुजन समाजवादी पक्ष या निवणुकीत चांगली कामगिरी करू शकणार का? याकडे राजकीय विश्लेषकांचं आणि अभ्यासकांचं लक्ष लागलं आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला फक्त 19 जागांवर यश मिळालं होत. मात्र 2022 ची निवडणूक येता-येता पक्षात फक्त 3 आमदारच शिल्लक राहिले आहे. यामधील काही आमदारांनी बसपाची साथ सोडत भाजप आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. तर काहींना स्वतः बसपा पक्ष प्रमुख मायावती यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
2017 मध्ये कोणत्या जागांवर मिळालं होत यश
गोरखपूर जिल्ह्यातील चिल्लुपार विधानसभा मतदारसंघातून 2017 मध्ये बसपाच्या तिकिटावर विजयी झालेले विनय शंकर तिवारी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. या निवडणुकीत याच जागेवरून सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी ही जागा त्यांचे वडील आणि पूर्वांचलचे बाहुबली म्हटले जाणारे हरिशंकर तिवारी यांची होती. याच मतदारसंघातून 1985 ते 2007 पर्यंत तिवारी हे आमदार होते. मात्र 2007 आणि 2012 मध्ये ते या जागेवरून पराभूत झाले होते. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला बसपाच्या तिकिटावर उभे केले आणि ते जिंकले ही.
बसपाला 2017 च्या निवडणुकीत आंबेडकरनगर जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळाले. तेथे त्यांनी 3 जागा जिंकल्या होत्या. त्यांनी जलालपूर, अकबरपूर आणि काटेहरी या जागा जिंकल्या. अकबरपूर मतदारसंघातून राम अचल राजभर विजयी झाले आहेत. सलग सहा वेळा ते या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी बसपा सोडली आणि सपाचे सदस्यत्व घेतले. तर काटेहरीमधून लालजी वर्मा विजयी झाले आहेत. ते तांड्यातून चार वेळा आमदारही राहिले होते. त्यांनीही बसपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे. सपाने त्यांना कठेहरीतूनच तिकीट दिले आहे. दरम्यान, 2017 मध्ये 19 जागांवर विजय मिळूनही 3 जागांवर सीमित झालेला बहुजन समाज पक्ष 2022 मध्ये किती जागांवर यश मिळवणार? हे 10 मार्च रोजी कळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: