एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं डिकोडिंग, जनतेच्या मँडेटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजप आणि महायुतीला सर्वच विभागात यश मिळालं.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजप आणि महायुतीला सर्वच विभागात यश मिळालं. असं असलं तरी विदर्भ आणि मराठवाड्यानं मोठा वाटा उचलला. उत्तर महाराष्ट्र नेहमीप्रमाणेच भाजपच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तर ठाणे कोकणाने मनापासून साथ दिली. महायुतीला विदर्भात 62 पैकी 48 जागा मिळाल्या. मराठवाड्यात 46 पैकी 40 जागा जिंकल्या. उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 41 जागा, ठाणे-कोकण 39 पैकी 32 आणि पश्चिम महाराष्ट्रात 58 पैकी 44 जागा, तर मुंबईत 36 पैकी 23 जागा जिंकल्या.

लोकसभेतील खराब कामगिरीनंतर महायुतीचे नेते खडबडून जागे झाले आणि प्रचारापासून ते योजनांच्या घोषणांपर्यंत आणि जागावाटपासून ते उमेदवार निवडीपर्यंत तिन्ही मुख्य नेत्यांनी सुसंवाद राखत टीमवर्कवर भर दिला. या निकालाचे अनेक अर्थ निघतात. महायुतीच्या दमदार कामगिरीला महाविकास आघाडीतील विसंवादाचीही प्रत्येक पावलावर साथ मिळाली. हा लाट नाही तर त्सुनामी आहे असं विरोधकही मान्य करतात.

विधानसभेच्या निकालाचा अर्थ काय?

- स्थिर सरकारसाठी महाराष्ट्रानं सलग तिसऱ्यांदा मतदान केलं.
- भाजप सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला.
- भाजपला सलग तिसऱ्यांदा 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या.
- भाजप आणि मित्रपक्षात समन्वय राखण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी...
- भाजपसोबत मित्रपक्षांनाही घवघवीत यश मिळालं.
- 58 जागा जिंकत शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं.
- अजित पवारांनी लोकसभेतील अपयश धुवून काढलं.
- राष्ट्रवादीने 41 जागा मिळवत भाजप-शिवसेनेला चांगली साथ दिली.
- विकास आणि भावनिक मुद्दे यांची सांगड घालण्यात यश आलं
- महिला मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागले.

मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा मजबूत-

आता महायुतीसमोर पहिलं आव्हान मुख्यमंत्री निवडीचं असेल. १३७ जागा जिंकून आल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा मजबूत झाला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या समंजसपणावर विश्वास ठेवून भाजप मुख्यमंत्रीपद घेईल अशी दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं तिन्ही पक्षांच्या पारड्यात भरभरुन दान टाकलं आहे त्याचा सदुपयोग महाराष्ट्राच्या हितासाठी हे तिन्ही नेते पुढची पाच वर्ष करतील हीच अपेक्षा...

कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?

महायुती- 236
महाविकास आघाडी- 49
इतर- 3
---------------------
भाजप- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 

अपक्ष- 2

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget