Dhule Vidhan Sabha Election Results 2024 : धुळे जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला, पाचही जागांवर दणदणीत विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra Vidhan Sabha Election Nivadnuk Nikal 2024 : धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा शिरपूर आणि साक्री यांचा समावेश होतो.
![Dhule Vidhan Sabha Election Results 2024 : धुळे जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला, पाचही जागांवर दणदणीत विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Dhule District Vidhan Sabha Election Results 2024 Shindkheda Sakri Shirpur Constituency Results maharashtra assembly nivadnuk nikal winners losers List Anil Gote Kunal Patil jaykumar rawal Mahayuti vs Mahavikas Aghadi BJP Shiv Sena Congress NCP MNS MIM Dhule Vidhan Sabha Election Results 2024 : धुळे जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला, पाचही जागांवर दणदणीत विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/0f1685233d3e1ca6c2e7bc5b9f2c2fe81732326704014923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhule District Assembly Election Results 2024 : धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा शिरपूर आणि साक्री यांचा समावेश होतो. पाचही विधानसभा मतदारसंघात शिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी भाजपाची तर साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते तर धुळे ग्रामीणमधून काँग्रेसने आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमने विजय प्राप्त केला होता. धुळे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दोन जागा काँग्रेसला एक एमआयएमला एक आणि अपक्ष एक असे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर यायला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात धुळ्यातील पाच विधानसभा मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला?
धुळे जिल्ह्यातील प्रमुख लढती
धुळे शहर : अनुप अग्रवाल, भाजप विजयी
धुळे शहरात भाजपाचे अनुप अग्रवाल, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी आ. अनिल गोटे आणि आणि एमआयएमचे आ. फारूक शाह तसेच समाजवादी पार्टीचे इर्शादभाई जहागिरदार रिंगणात असल्याने याठिकाणी भाजपा, शिवसेना उध्दव ठाकरे गट, एमआयएम आणि समाजवादी पार्टी अशी चौरंगी लढत झाली.
धुळे ग्रामीण : राम भदाणे भाजप विजयी
धुळे ग्रामीण मतदार संघात काँग्रेसचे आ. कुणाल पाटील विरूध्द भाजपाचे राम भदाणे या दोन प्रमुख पक्षात लढत होईल असे वाटत होते. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे हिलाल माळी यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने याठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. परिणामी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पहायला मिळाली.
शिंदखेडा : जयकुमार रावल, भाजप विजयी
शिंदखेडा मतदार संघात भाजपाचे आ. जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने याठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. परिणामी याठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती.
शिरपूर : कांशीराम पावरा, भाजप विजयी
शिरपूरमध्ये भाजपाचे आ. काशिराम पावरा आणि भारतीय कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडीयाचे कॉ. बुधा पावरा यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. जितेंद्र ठाकूर रिंगणात आहेत. परिणामी याठिकाणी भाजपा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया आणि अपक्ष असा तिरंगी सामना झाला.
साक्री : मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट विजयी
साक्रीत शिवसेना शिंदे गटाच्या आ. मंजुळा गावित, काँग्रेसचे प्रविण चौरे यांच्यासह भाजपाचे बंडखोर उमेदवार मोहन सुर्यवंशी रिंगणात होते. याठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसत असून शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत याठिकाणी पहावयास मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)