एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उपराजधानी नागपूरसह विदर्भात विधानसभेच्या निवडणुका जाहीर! मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल अखेर आज फुंकल्या गेले  आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. राज्यभरात विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) एकाच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे उपराजधानी नागपूर  आणि संपूर्ण विदर्भात देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. नागपूरसह विदर्भातील 12 मतदारसंघात  20 नोव्हेबरला मतदान होईल. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

विदर्भातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
  • मतदान  :20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024
  • निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर 2024

288 जागांसाठी किती मतदार असतील? 

  • एकूण मतदार - 9 कोटी 59 लाख
  • नव मतदार - 19.48 लाख
  • पुरूष मतदार - 4.95 कोटी
  • महिला मतदार - 4.64 कोटी
  • तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
  • 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार - 6.32 लाख

नागपूरसह विदर्भात कोणाचं वर्चस्व?

दरम्यान, महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप (BJP) आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

संबंधित बातमी:

Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad : ⁠निवडणूक जाहीर, जागावाटप रखडलं? मविआत मुंबईच्या जागांवरुन राडा? ABP MAJHAEknath Shinde On Vidhan Sabha Election : दोन वर्षात केलेल्या कामची पोचपावती जनता आम्हाला देईल- शिंदेHeadlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Embed widget