एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन

Devyani Pharande Meets Devendra Fadnavis : भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव नसल्याने त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून महायुतीत भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर आता देवयानी फरांदे 24 नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. 

भाजपच्या पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले (Rahul Dhikle), नाशिक पश्चिममधून सीमा हिरे (Seema Hiray),  बागलाणमधून दिलीप बोरसे  (Dilip Borse), चांदवडमधून डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर आहेत. देवयानी फरांदे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. 

देवयानी फरांदेंचे सागर बंगल्यावर शक्तिप्रदर्शन

यानंतर आज देवयानी फरांदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. 24 नगरसेवकांसोबत देवयानी फरांदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. सागर बंगल्यावर देवयानी फरांदे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून भाजपची दुसरी यादी येण्यापूर्वी देवयानी फरांदे यांच्याकडून आपले तिकीट फिक्स करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि देवयानी फरांदे यांच्यात नेमकी काय चर्चा होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राहुल आहेर - केदा आहेर देखील फडणवीसांची घेणार भेट

दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र तीन दिवसांपूर्वीच राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे बंधू केदा आहेर यांच्या उमेदवारी देण्याची शिफारस राहुल आहेर यांनी केली होती. मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचे नाव आल्याने आहेर बंधू आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आता चांदवडमधून राहुल आहेर की केदा आहेर? कुणाला तिकीट मिळणार? याचा फैसला देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात होणार आहे. देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी

व्हिडीओ

Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
Amravati Mahayuti Formula : अमरावतीत राष्ट्रवादीला वगळून भाजप शिवसेनेची युती, जागा वाटपासाठी बैठक सुरु, संभाव्य फॉर्म्युला समोर
अमरावती महापालिकेसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर,महायुतीत कोण किती जागा लढणार? राष्ट्रवादीचं काय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
Embed widget