एक्स्प्लोर

Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण

Satyajit Tambe meets Devendra Fadnavis : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना राज्यात रंगणार असून भाजपकडून कालच 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) यांची उमेदवारांची यादी कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत अजून काही जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असून आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांची जोरदार चर्चा झाली होती. कारण सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना ऐनवेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) पाठिंबा दिला होता. त्यातच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सत्यजित तांबे यांच्यावर आपली नजर असल्याचे म्हटले होते. सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की, आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. यानंतर सत्यजित तांबे यांना भाजपने छुपा पाठींबा दिल्याची चर्चा होती. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.  

सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 

आता आमदार सत्यजित तांबे अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे आहेत. सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी: महायुती राज ठाकरेंच्या मदतीची बिनशर्त परतफेड करणार; निवडक मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Embed widget