(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi Assembly Constituency 2024 : विखे पाटलांनी गड राखला! शिर्डीत धडाकेबाज विजय, काँग्रेसच्या उमेदवारा दारुण पराभव!
Shirdi Assembly BJP Radhakrishna Vikhe Patil vs Congress Prabhavati Ghogre Result : भारतीय जनता पक्षाने आज विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
Shirdi Assembly Constituency 2024 : शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरते होते, आणि अखेर विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. तेथे काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा त्यांनी पराभव केला. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून पहिल्या फेरीत शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यांचा मोठा विजय झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. तर, महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे.
विधानसभेच्या 288 मतदारसंघाचं चित्र जवळपास स्पष्ट
राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. पहिल्या दोन तासांत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहिला मिळाली, मात्र 11 वाजल्यानंतर म्हणजेच सकाळी 10.30 नंतर भाजप महायुतीचा कल एकतर्फी विजयाकडे गेला. सध्या 200 हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडी मागे पडली आहे.
2014 मध्ये शिर्डी मतदार संघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. तेव्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील 1,21,459 मतं मिळवून विजयी झाले होते. तर शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांचा 74,662 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर विखे पाटील भाजपमध्ये गेल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डीत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील 1,31,316 मतांनी विजयी झाले होते. तर काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा 87,024 मतांनी पराभव झाला होता.
शिर्डी विधानसभा मतदार संघ हा विखे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिर्डी विधानसभेवर अनेक वर्षांपासून विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतरही विखे पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखले. याठिकाणी सध्या मविआच्या उमेदवार म्हणून माजी आमदार चंद्रकात घोगरे यांच्या सुनबाई प्रभावती घोगरे यांना तिकिट दिले होते. प्रभावती घोगरे या विखे पाटलांच्या कट्टर विरोधक आहेत. तसेच त्यांचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध आहेत.
हे ही वाचा -