एक्स्प्लोर

Akola Assembly Election Politics: भाजपाने प्रहारच्या प्रदेशाध्यक्षला फोडलं, बच्चू कडूंनीही दंड थोपटले, बडा मासा गळाला लावून अकोल्यात गेम फिरवला!

काल दिवसभरात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात मोठंच 'इनकमिंग' झाल्याचं दिसलं.

Akola Vidhansabha Election 2024:राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अकोल्याचा राजकारणात काल दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळल्यानंतर आता बच्चू कडूंनी भाजपचा बडा मासा गळ्याला लावत अकोल्यातील राजकारणाचा गेम फिरवल्याचं दिसतंय.

8 वर्ष भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आणि सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले भाजपचे अशोक ओळंबे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला असून आज ते विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  अकोल्यातून भाजपने माजी शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांना तिकीट दिलं आहे. तर बच्चू कडूंनी भाजपच्या शहराध्यक्षाला प्रहारमध्ये घेत दंड थोपटले आहेत.    

बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये मोठं इनकमिंग

काल दिवसभरात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात मोठंच 'इनकमिंग' झाल्याचं दिसलं. एकीकडे भाजपचे आठ वर्ष अकोला शहराध्यक्ष राहिलेले आणि सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ अशोक ओळंबे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचाही मध्यरात्री प्रहारमध्ये प्रवेश झाल्याचं कळतं. बाळापुर मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या जिल्हाध्यक्षांनी 'रामराम' ठोकत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. बाळापुर मतदारसंघातून कृष्णा अंधारे आता प्रहारचे उमेदवार असतील. त्यामुळे अजित पवार गटाला बाळापुर मतदारसंघात मोठाच धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय.

3 पक्ष बदलत शेवटी प्रहार तिकीट

गेल्या काही दिवसांमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार मध्ये अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे. तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपात प्रवेश करणारे रवी राठी यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला होता. एकाच आठवड्यात तीन पक्ष बदलण्याचा अनोखा विक्रम रवी राठी यांनी केल्याची चर्चा आहे. दरम्यान मुर्तीजापुर मधून भाजपकडून रवि राठी यांना तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. 2019 च्या निवडणुकीत रवी राठींना राष्ट्रवादीचे तिकिटावर तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 42000 मते मिळाली होती. दरम्यान मध्यरात्री डॉक्टर अशोक कोळंबे यांचा निवासस्थानी प्रहार मध्ये प्रवेश केल्यानंतर आता मूर्तिजापूरमधून रवी राठी हे प्रहार चे उमेदवार असतील.

हेही वाचा:

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचा बच्चू कडूंना जोरदार धक्का; प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपच्या गळाला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...
संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...
Nawab Malik: मोठी बातमी: भाजपचा विरोध डावलून अखेर अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला, पण....
मोठी बातमी: भाजपचा विरोध डावलून अखेर अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला, पण....
Shrinivas Pawar: अजितदादांच्या वक्तव्यावर सख्ख्या भावाची प्रतिक्रिया, 'साहेबांनी 30 वर्ष, दादांनी 30 वर्ष, आता नवीन पिढीला संधी...', आरोपांवर म्हणाले, ' ते चुकीचे अन् दुर्दैवी..'
अजितदादांच्या वक्तव्यावर सख्ख्या भावाची प्रतिक्रिया, 'साहेबांनी 30 वर्ष, दादांनी 30 वर्ष, आता नवीन पिढीला संधी...', आरोपांवर म्हणाले, ' ते चुकीचे अन् दुर्दैवी..'
Mohol Vidhan Sabha: सिद्धी कदमांचा एबी फॉर्म अचानक कॅन्सल, शरद पवार गटाचा मोहोळचा नवा उमेदवार ठरला, राजू खरे उतरणार रिंगणात
सिद्धी कदमांचा एबी फॉर्म अचानक कॅन्सल, शरद पवार गटाचा मोहोळचा नवा उमेदवार ठरला, राजू खरे उतरणार रिंगणात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

mit Thackeray Win Mahimkar Pray Ekvira Devi अमित ठाकरेंच्या विजयासाठी माहीमकरांचा एकवीरा देवीला नवसABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 October 2024Sanjay Raut On Shrinivas Vanaga: श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले - संजय राऊतHingoli BJP Nomination | वसमत विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...
संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...
Nawab Malik: मोठी बातमी: भाजपचा विरोध डावलून अखेर अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला, पण....
मोठी बातमी: भाजपचा विरोध डावलून अखेर अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला, पण....
Shrinivas Pawar: अजितदादांच्या वक्तव्यावर सख्ख्या भावाची प्रतिक्रिया, 'साहेबांनी 30 वर्ष, दादांनी 30 वर्ष, आता नवीन पिढीला संधी...', आरोपांवर म्हणाले, ' ते चुकीचे अन् दुर्दैवी..'
अजितदादांच्या वक्तव्यावर सख्ख्या भावाची प्रतिक्रिया, 'साहेबांनी 30 वर्ष, दादांनी 30 वर्ष, आता नवीन पिढीला संधी...', आरोपांवर म्हणाले, ' ते चुकीचे अन् दुर्दैवी..'
Mohol Vidhan Sabha: सिद्धी कदमांचा एबी फॉर्म अचानक कॅन्सल, शरद पवार गटाचा मोहोळचा नवा उमेदवार ठरला, राजू खरे उतरणार रिंगणात
सिद्धी कदमांचा एबी फॉर्म अचानक कॅन्सल, शरद पवार गटाचा मोहोळचा नवा उमेदवार ठरला, राजू खरे उतरणार रिंगणात
Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीत पुन्हा 'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसचे नेते अपक्ष रिंगणात
महाविकास आघाडीत पुन्हा 'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसचे नेते अपक्ष रिंगणात
Shriniwas Vanaga Not Reachable  : पालघर शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून नाॅट रिचेबल
Shriniwas Vanaga Not Reachable : पालघर शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून नाॅट रिचेबल
Yugendra Pawar: 'आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात...', अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार म्हणाले, 'आजीला राजकारणात...'
'आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात...', अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार म्हणाले, 'आजीला राजकारणात...'
Vidhan Sabha Election : मुंबईत महायुतीवर बंडखोरीचं वादळ; वांद्रे पूर्व, दिंडोशीतून नाराजांचा एल्गार; थेट अपक्ष लढण्याची घोषणा
मुंबईत महायुतीवर बंडखोरीचं वादळ; वांद्रे पूर्व, दिंडोशीतून नाराजांचा एल्गार; थेट अपक्ष लढण्याची घोषणा
Embed widget