एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचा बच्चू कडूंना जोरदार धक्का; प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपच्या गळाला 

प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Parivartan Mahashakti News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन (Parivartan Mahashakti) आघाडीने आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवत विधानसभा निवडणुक अधिक चुरशीची केली आहे.

दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रहार आणि  बच्चू कडू यांना विदर्भात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपने जोरदार धक्का दिल्याचे बोलेले जात आहे.

4 नोव्हेंबरला मोठा स्फोट पाहायला मिळणार

चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. जरांगे पाटील यांच्या संबंधात माझे काही बोलणे झाले नाही.  उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल.  माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला. 

परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार

 1. अचलपूर - बच्चू कडू  - प्रहार

2. रावेर - अनिल चौधरी - प्रहार

3. चांदवड - गणेश निंबाळकर  - प्रहार

4. देगलूर - सुभाष सामने - प्रहार

5. ऐरोली - अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष

6. हदगाव हिमायतनगर - माधव देवसरकर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

7. हिंगोली - गोविंदराव भवर - महाराष्ट्र राज्य समिती

8. राजुरा - वामनराव चटप - स्वतंत्र भारत पक्ष

हे ही वाचा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला उमेदवारी?ABP Majha Headlines : 6 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सKishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Gopichand Padalkar : जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
BJP Candidate List : कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
BJP candidate list: भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
Embed widget