एक्स्प्लोर

वैजापूर विधानसभा मतदारसंघ | वैजापूर मतदारसंघ शिवसेनेकडे खेचण्यात यश येणार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर या दोघांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून चुलत्या-पुतण्याच्या शर्यतीत उमेदवारीचे झुकते माप कोणाच्या पारड्यात पडणार यांची उत्सुकता आहे.

औरंगाबाद : राज्यामध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपाची युती तुटली होती. त्यात मोदी लाट, याचा फटका शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांना बसला. त्यातीलच एक मतदार संघ म्हणजे वैजापूर. 2014 पूर्वी सलग पंधरा वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपा एकत्र लढेल असं सध्यातरी चित्र आहे. राज्यात आणि देशात शिवसेना-भाजपा सरकार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलेली आहे.

1999 ते 2014 दरम्यान झालेल्या चारही लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली होती. विजय आणि मताधिक्क्‍यांची ही परंपरा गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र खंडीत झाली होती. युती तुटल्याचा पुरेपूर फायदा उचलत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवर वैजापूरमधून 4709 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या आर. एम. वाणी यांचा पराभव केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांनी निवडणुकीपासून लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरनारे यांना उमेदवारी देण्याची शिफारस पक्ष श्रेष्ठींकडे केली असल्याचे सांगण्यात येत.

लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून आघाडी देखील मिळालेली होती. त्यामुळे याच मतदारसंघातून चंद्रकांत खैरे पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. त्याबरोबर छगन भुजबळ हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी खुद्द छगन भुजबळ यांनीदेखील या मतदारसंघातून उभा राहण्यासाठी चाचपणी केल्याचं बोललं जातं. विधानसभा निवडणूक रणधुमाळीत हा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीच्या नवीन जागा वाटप समीकरणात कोणाकडे जाणार यांचे वेध प्रामुख्याने दोन्ही पक्षातील इच्छुकांना लागेल आहेत. तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेल्या जागेवर काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकण्याची हालचाल सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर या दोघांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून चुलत्या-पुतण्याच्या शर्यतीत उमेदवारीचे झुकते माप कोणाच्या पारड्यात पडणार यांची उत्सुकता आहे. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज ठोंबरे तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर, प्रमोद नांगरे या दोघात उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा आहे.

भाजपने या मतदारसंघात स्वबळावर निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धडा घेत मतदारसंघात पुन्हा उतरण्यासाठी एकनाथ जाधव चार वर्षापासून तयारी करत आहेत. तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवारांनी तगडं आव्हान दिलं होतं. निवडणुकीत उभे असलेले हर्षवर्धन जाधव यांना देखील या मतदारसंघातून चांगली मते मिळाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ती घटली असली वैजापूरने शिवसेनेला खंबीरपणे साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गत लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 49 हजार 058 मतांची आघाडी मिळाली होती. ती यावेळी तब्बल 37 हजार 941 मतांनी घटली.

2019 च्या लोकसभेला निवडणुकीतील वैजापूर मतदारसंघातील आकडेवारी

  • चंद्रकांत खैरे (शिवसेना) - 66,971 मते
  • र्षवर्धन जाधव (अपक्ष) - 55,554 मते
  • इम्तियाज जलील (एमआयएम) - 35,462 मते

अर्थात संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असताना थोड्याफार प्रमाणात जी लीड मिळाली त्यात वैजापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

2014 विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी

  • भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) - 53,114 मते
  • आर. एम. वाणी (शिवसेना) - 48,405 मते
  • डॉ. दिनेश परदेशी (काँग्रेस) - 41,346 मते
  • एकनाथ जाधव (भाजप) - 24,243 मते

विधानसभा निवडणुकीआधी चंद्रकांत खैरे, छगन भुजबळ या दिग्गजांची नावे या मतदारसंघातून पुढे येत आहेत. असं झाल्यास वैजापूर मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलेला असेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
New Zealand Squad For India Tour : रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: पहिले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन, मग ते ठिकाण...; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा, काय काय घडणार?
पहिले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन, मग ते ठिकाण...; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा, काय काय घडणार?
Embed widget