एक्स्प्लोर
Advertisement
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कोणकोणत्या प्रमुख लढती?
दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दहा जागांवर मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे
मुंबई : लोकसभा निवडणुकांतील दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दहा जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सोलापूर, बीड, नांदेड मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी कालच अर्ज दाखल केले.
दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 29 मार्चपर्यंत मुदत आहे. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस), डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) आणि प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), नांदेडमधून अशोक चव्हाण (काँग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे (भाजप), बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी) यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केले. तर इतर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.
दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. पहिल्या टप्प्यासाठी गुरुवार 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 28 मार्चपर्यंत मुदत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांत मतदान होईल.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती
अकोल्यात तिरंगी सामना
अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी पटेलांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. या जागेवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची महाआघाडीशी बोलणी सुरु होती, मात्र ती फिस्कटल्याने आंबेडकरांचीही टक्कर असेल. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते. त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत ही तिरंगी होणार आहे.
सोलापुरातही तिहेरी लढत
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. अकोल्याप्रमाणेच सोलापुरातूनही आंबेडकर रिंगणात उतरले आहेत. भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र आंबेडकरांचं आव्हान तगडं ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार.
अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा
शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.
नांदेडमधून काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार
गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तेही ना'राजी'नाम्याचं नाट्य झाल्यानंतर. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकराची टक्कर त्यांना असेल. त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.
विद्यमान खासदाराला 'बाद' करणारा उस्मानाबाद
उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानले जाणारे दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.
बीडचा सोपा गड
बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.
बुलडाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत.
मराठवाड्यात चित्र काय?
परभणीतूनही शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात उतरले आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे पक्षाने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. तर हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लढतींवर एक नजर (10)
अकोला - संजय धोत्रे (भाजप) VS हिदायत पटेल (काँग्रेस) VS प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
सोलापूर शहर - डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) VS सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) VS प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
अमरावती - आनंदराव अडसूळ (शिवसेना) VS नवनीत कौर राणा (महाआघाडीचा पाठिंबा)
नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) VS अशोक चव्हाण (काँग्रेस)
बीड - डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) VS बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी)
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना) VS राणा जगजितसिंग (राष्ट्रवादी)
बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) VS राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
परभणी - संजय जाधव (शिवसेना) VS राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
लातूर - सुधाकरराव शिंगारे (भाजप) VS मच्छिंद्र कामंत (काँग्रेस)
हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना) VS सुभाष वानखेडे (काँग्रेस)
--------------------------------------
पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती (07)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस)
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)
चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस)
रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
--------------------------------------
तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढती
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप) VS प्रिया दत्त (काँग्रेस)
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना) VS मिलिंद देवरा (काँग्रेस)
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिवसेना) VS एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तिकर (शिवसेना) VS संजय निरुपम (काँग्रेस)
ठाणे - राजन विचारे (शिवसेना) VS आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) VS बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
भिवंडी - कपिल पाटील (भाजप) VS सुरेश टावरे (काँग्रेस)
रायगड - अनंत गीते (शिवसेना) VS सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग - विनायक राऊत (शिवसेना) VS नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) VS निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) VS पार्थ पवार (राष्ट्रवादी)
शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) VS अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
बारामती - कांचन कुल (भाजप) VS सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
सातारा - नरेंद्र पाटील (शिवसेना) VS उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) VS धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) VS समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
दिंडोरी - डॉ. भारती पवार (भाजप) VS धनराज महाले (राष्ट्रवादी)
जळगाव - स्मिता वाघ (भाजप) VS गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) VS राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
धुळे - सुभाष भामरे (भाजप) VS कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
नंदुरबार- हीना गावित (भाजप) VS के. सी. पडवी (काँग्रेस)
शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना) VS भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
अहमदनगर - सुजय विखे पाटील (भाजप) VS संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना) VS सुभाष झांबड (काँग्रेस) VS इम्तियाज जलील (वंचित बहुजन आघाडी)
जालना - रावसाहेब दानवे (भाजप) VS विलास औताडे (काँग्रेस)
संबंधित बातम्या :
शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार
गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement