Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: नारायण राणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे...; राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचं काय?
Lok Sabha Election Maharashtra Result 2024 Raj Thackeray: सध्या राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याचे दिसून येत आहे.
![Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: नारायण राणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे...; राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचं काय? Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray MNS chief Raj Thackeray held a public meeting on the victory or defeat of the grand alliance candidates, lets know Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: नारायण राणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे...; राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/03/bb96f0621fbeab71107321f72611e1281717406842119987_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election Maharashtra Result 2024 Raj Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Lok Sabha Result 2024) निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबईत महायुतीचा विजय झाला आहे. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर ठाणे, कल्याण, पुणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. सध्या राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरेंनी कुठे-कुठे सभा घेतल्या?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी कणकवलीत सभा घेतली. तर पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी पुण्यात सभा घेतली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचयासाठी राज ठाकरेंनी कळव्यात सभा घेतली होती.
मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली होती. मुंबई लोकसभेच्या 6 जागांवरील महायुतीच्या उमेदवारांसाठी आणि महायुतीची ही सांगता सभा होती. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार उज्वल निकम, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींनी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली.
राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या उमेदवारांचा निकाल काय?
उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ | विरोधी पक्षातील उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवाराचे नाव |
नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग ) | विनायक राऊत | नारायण राणे |
मुरलीधर मोहोळ (पुणे) | रवींद्र धंगेकर, वसंत मोरे | मुरलीधर मोहोळ |
नरेश म्हस्के (ठाणे) | राजन विचारे | नरेश म्हस्के |
श्रीकांत शिंदे (कल्याण) | वैशाली दरेकर | श्रीकांत शिंदे |
यामिनी जाधव (दक्षिण मुंबई) | अरविंद सावंत | अरविंद सावंत |
राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) | अनिल देसाई | अनिल देसाई |
पियुष गोयल (उत्तर मुंबई) | भूषण पाटील | पियुष गोयल |
उज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई) | वर्षा गायकवाड | वर्षा गायकवाड |
रवींद्र वायकर (वायव्य मुंबई) | अमोल किर्तीकर | रवींद्र वायकर |
मिहीर कोटेचा (ईशान्य मुंबई) |
संजय दिना पाटील | संजय दिना पाटील |
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)