(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Election: मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील 38 जागांसाठी 78.03 टक्के मतदानाची नोंद, कांगपोकपी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या पहिल्या टप्प्यात 38 जागांसठी मतदान झाले. या 38 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Manipur Election : सोमवारी मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या पहिल्या टप्प्यात 38 जागांसठी मतदान झाले. काल पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. या 38 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सर्वाधिक 82.97 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम इंफाळ जिल्ह्यात 82.19 टक्के, इम्फाळ पूर्व जिल्ह्यात 76.64 टक्के आणि चुरचंदपूरमध्ये 74.45 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मणिपूरमधील पाच जिल्ह्यातील 38 जागांसाठी मतदान पार पडले. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तसेच कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या 38 जागांसाठी 15 महिलांसह एकूण 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काल दिवसभरात एका ठिकाणी
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, काल मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी यासाठी जोरदार प्रचार केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्रिपुराचे समकक्ष बिप्लब कुमार देब, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) प्रमुख कोनराड के संगमा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा, राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी यावेळी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या सर्व निवडणुकांचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये कोणाची सत्ता येणार यासाठी 10 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये मतदानाचा पुढचा टप्पा 5 मार्चला पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: