एक्स्प्लोर

Elections 2022 : मतदानाआधी पंतप्रधान मोदींचं आवाहन; म्हणाले, आधी मतदान, मगच दुसरं काम!

Elections 2022 Live: यूपी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांसह गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज मतदान सुरु आहे  पंतप्रधान मोदी यांनी मतदान सुरु होण्याआधी ट्वीट केलं आहे

Elections 2022 Live: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज मतदान सुरु आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन राज्यांमधील मतदान सुरु होण्याआधी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेश विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यात सर्व जागांसाठी मतदान आज पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या पावन पर्वात सहभागी व्हा. मतदानाचा नवा विक्रम बनवा. लक्षात ठेवा, आधी मतदान, मगच दुसरं काम असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान सुरु आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.

यूपीच्या कोणत्या जागांवर मतदान
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान

उत्तराखंडमधील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतजानाला सुरूवत होणार आहे. संध्याकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.

गोव्यात 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोवा विधानसभेत सध्या चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी गोव्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिथे आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC)हे निवडुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्यातही चांगली लढत होणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनीही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जरी आज पार पडली तरी कोण निवडणूक जिंकले हे पाहण्यासाठी 10 मार्चची वाट पाहावी लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget