एक्स्प्लोर

Elections 2022 Voting Live: निवडणुकीचा रणसंग्राम, गोवा, उत्तराखंडसह यूपीत दुसऱ्या टप्प्याचं मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स

Elections 2022 :  आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

LIVE

Key Events
Elections 2022 Voting Live: निवडणुकीचा रणसंग्राम, गोवा, उत्तराखंडसह यूपीत दुसऱ्या टप्प्याचं मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स

Background

Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.

यूपीच्या कोणत्या जागांवर मतदान 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान

उत्तराखंडमधील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतजानाला सुरूवत होणार आहे. संध्याकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.

गोव्यात 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोवा विधानसभेत सध्या चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी गोव्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिथे आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC)हे निवडुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्यातही चांगली लढत होणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनीही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जरी आज पार पडली तरी कोण निवडणूक जिंकले हे पाहण्यासाठी 10 मार्चची वाट पाहावी लागणार आहे.

14:58 PM (IST)  •  14 Feb 2022

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

    • अल्मोडा -  30.37 %

    • उत्तरकाशी-  40.12 %

    • उधमसिंह नगर  - 37.17 %

    • चमोली - 33.82 %

    • चम्पावत -  34.66 %

    • टिहरी-गढवाल -  32.59 %

    • देहरादून -   34.45 %

    • नैनीताल-  37.41 %

    • पिथौरागढ-  29.68 %

    • पौडी-गढवाल - 31.59 %

    • बागेश्वर - 32.55 %

    • रूद्रप्रयाग - 34.82 %

  • हरिद्वार -  38.83 % 
14:05 PM (IST)  •  14 Feb 2022

Goa Elections 2022 Voting Live: गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान; दुपारी 1 पर्यंत 44.62 टक्के मतदान

गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान

दुपारी १ वाजता मतदानाचा टक्का वाढला

दुपारी 1 पर्यंत 44.62 टक्के मतदान

साखळी मतदार संघात सर्वाधिक 54 टक्के चुरशीने मतदान

तर कुपे, पिरोळ आणि मांद्रे मतदार संघात मतदारांचा वाढता प्रतिसाद

14:04 PM (IST)  •  14 Feb 2022

Elections 2022 Voting Live: उत्तरप्रदेशातील 9 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 39.7 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तरप्रदेशातील 9 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 39.7 टक्के मतदान

    • सहारनपूर –   42.44 %

    • बिजनौर –  38.64 %

    • मुरादाबाद –  42.28 %

    • संभल-  38.01 %

    • रामपूर –  40.10 %

    • अमरोहा –  40.90 %

    • बदायूं –  35.57 %

    • बरेली  -  39.41 %

  • शाहजहांपूर –  35.47 %
14:03 PM (IST)  •  14 Feb 2022

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live: उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 35.21 टक्के मतदान

    • अल्मोडा -  30.37 %

    • उत्तरकाशी-  40.12 %

    • उधमसिंह नगर  - 37.17 %

    • चमोली - 33.82 %

    • चम्पावत -  34.66 %

    • टिहरी-गढवाल -  32.59 %

    • देहरादून -   34.45 %

    • नैनीताल-  37.41 %

    • पिथौरागढ-  29.68 %

    • पौडी-गढवाल - 31.59 %

    • बागेश्वर - 32.55 %

    • रूद्रप्रयाग - 34.82 %

    • हरिद्वार -  38.83 % 
 
13:35 PM (IST)  •  14 Feb 2022

गोव्यात एक वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान

Elections 2022 Voting Live:   गोव्यात एक वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.