एक्स्प्लोर

अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या

महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराची ही पद्धत मी स्वत: तयार केली, आपल्याकडे कमी वेळ आहे मग मी प्लान केला की काही ठिकाणी रोड शो, काही सभा, काही ठिकाणी मुलाखती करायच्या.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर सभांचा, रोड शो आणि मुलाखतींचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर भाष्य केले, सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवलेल्या मुंबईतील कोस्टल रोड आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या 1 लाख रुपयांच्या चॅलेंजवरही भूमिका मांडली. तसेच, राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमधून मुंबईतील (Mumbai) विमानतळाची जागा हडपण्याचा आणि मुंबई ताब्यात घेण्याचा डाव असल्याची टीका केली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तरे दिले, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.  

महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराची ही पद्धत मी स्वत: तयार केली, आपल्याकडे कमी वेळ आहे मग मी प्लान केला की काही ठिकाणी रोड शो, काही सभा, काही ठिकाणी मुलाखती करायच्या. त्यातून आपला अजेंडा सर्वत्र पोहचविता येतो आणि लोकांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पोहचतो, असे फडणवीसांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार करत फडणवीस म्हणाले, मी विनंती करतो की, कृपया जाऊन ठाकरेंकडून माझे एक लाख रुपये घेऊन या. कारण, मी मुंबई सोडून सगळीकडे फक्त विकासावर बोलत आहे आणि मुंबईत मी उत्तर देत आहे. त्यामुळे माझे 1 लाख रुपये घेऊन या, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिले होते. भाजपने हिंदू मुस्लिम केली नाही, अशी निवडणूक दाखवा आणि माझ्याकडून 1 लाख रुपये, असे ठाकरेंनी म्हटले होते. माझा लेंज अस होत की, उद्धव ठाकरे यांचे विकासावरचे भाषण दाखवा आणि सात हजार घेऊन जा, असेही फडणवीसांनी सांगितले.

कोस्टल रोडवरुन फडणवीसांचा पलटवार

आमचे प्रकल्प चोरले ह्यावर राइट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला, पुष्पक विमान तर रामायणातही होते मग राईट ब्रदरला का श्रेय देतो, हा जो कोस्टल रोड आहे, ही संकल्पना जुनी होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ्या प्रोजेक्टवर राज्यात सरकार त्यांचे होते, पण काही झाले नाही. मग मी मुख्यमंत्री झालो, 2 वर्ष पाठपुरावा केला आणि मोदीजी यांच्यासोबत 5 बैठका झाल्या. एकनाथ शिंदे एमएसआरडीसीचे मंत्री होते, एमएमआरडीए करायला तयार होते तेव्हा उद्धवसाहेब सोबत होते, त्यांनीच महापालिकेला तो रोड करू द्यावे म्हटले. मग आम्ही म्हटल की, महानगरपालिकेने करू द्या, कोर्टात केस झाली आणि आम्ही जिंकलो. मी मुख्यमंत्री असताना मला न सांगता कोस्टल रोडचे भूमिपूजन करण्यात आले, मला एक अधिकाऱ्याने सांगितले की भूमिपूजन करत आहे तुम्ही सांगाल तर पुन्हा करू, तेव्हा मी म्हटलो त्यांना भूमिपूजन करू द्या, मी उद्घाटन करेल. आम्ही पाहिला आणि दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. मात्र, त्यांनी लपून-छपून भूमिपूजन केले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सध्याचं राजकारण महिला केंद्रीत

आताचे जे राजकारण आहे ते महिला सेंट्रिक होऊ लागले आहे, मोदींनी विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून महिला अधिक जास्तीने काम करू लागल्या आहेत. नारी शक्तीचा अजेंडा आम्ही घेतला आहे. देवाभाऊ म्हणून मी इस्टॅब्लिश झालो आहे, आता बहीण आणि भाऊ सगळे मला देवाभाऊच बोलत आहेत.

महापालिकेत मोठा भ्रष्टाचार

महापौरपद त्यांच्याकडे, स्टडिंग कमिटी पद त्यांच्याकडे, दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याकडे, आम्हाला एखाद दुसरे पद मिळायचे. सत्ता काग्रेसची होती पण त्यांचे काही नसायचे. मी मुख्यमंत्री झालो आणि मला तक्रार आली की, 200 रस्त्यांमध्ये डांबराखाली पीक्यूसी लेवल नव्हती. मग मी अॅक्शन घेतली, जेलमध्ये टाकले आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केले, असेही फडणवीसांनी म्हटले. 2017 च्या निवडणुकीत आमचे 82 नगरसेवक आले, त्यांचे 84 निवडून आले होते. शिंदे साहेब आणि नार्वेकरांनी मला फ़ोन केला, उद्धव ठाकरे दरवाजा बंद करून बसले होते. त्यावेळी, आम्ही ठरविले की, आम्ही महापालिकेत वाचडॉगसारखे बसू. पण, ह्यांनी कचरा घोटाळा केला आणि हजारो कोटी रुपये खाल्ले, पर्यावरणच्या गोष्टी करतात, मिठ्ठी नदी गाळाच्या गोष्टी करतात, पण यांनी गाळ खाल्ला, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमातून केला.

कोविडमध्येही पैसे खाल्ले

कोविडच्या घोटाळ्यात कोणाचे जावई होते, जे जेलमध्ये कोट्यावधी रुपये घेऊन कोविड सेंटर खोलले. डॉक्टर, नर्स आणि स्टाफच्या नावाने पैसे खाल्ले. शेडो लोक कोविडमध्ये मृत्युमुखी पडले, कसायापेक्षा काय उपमा द्यायची, अशा शब्दात फडणवीसांनी कोविड काळातील घोटाळ्यावर भाष्य केलं. रेमिि्ह इंजेक्शन, कफन बॉडी बॅगचा घोटाळा, खिचडी घोटाळा केला, यांच्या घोटाळ्याच्या कहाण्या मी सांगू लागलो तर मल दिवस पुरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

अजित पवार अन् आदित्य ठाकरेंवर टीका

आदित्यला प्रमोट करण्याचा ते खूप प्रयत्न करत आहेत. पण ते जमू नाही राहिले आदित्यसाठी माझी गरज काय? माझा एखादा वार्ड अध्यक्ष करेल किंवा एखादा उमेदवार करेल, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. तसेच, पुण्यात अजितदादांनी टीका इतकी केली, त्यावर मी संयम पाळला, मी टीका केली नाही. पण, त्यांनी पातळी सोडून टीका केली ती अयोग्य आहे, त्याचे मला दुःख झाले, असेही फडणवीसांनी म्हटले.

महायुतीत काय ठरलं

मुंबईत म्ही थेट भूमिका घेतली की, तुमचे अध्यक्ष नवाब मलिक होते म्हणून आम्ही सोबत लढणार नाही. पुण्यातही मी संगितले होते,म्ही एकत्र लढणार नाही, आमची मैत्रीपूर्ण लढत नाही. लिहून घ्या आम्हाला युतीमध्ये कोणाची गरज पडणार नाही, भाजप शिवसेना रिपाइं युती बहुमतापेक्षा जास्त आकडे येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये आमचे 15 आमदार आहेत, त्यांचे 5 म्हणजे रेशो काय असला पाहिजे 35:65 पण आम्ही 45:55 केल आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही 45 जागा घेतल्या, त्यांना 55 जागा दिल्या. महापौरपद सोडल नाही, युतीचा महापौर होईल. अद्याप ठरलेल नाही, मुंबईतही तसेच असेल निर्णय युती म्हणून घेऊ, असे फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस असेपर्यंत कोणी मुंबईला हात लाऊ शकत नाही

मुंबई हा भूभाग आहे, काही चालत नेता येणार नाही. मुंबई अशी कशी कोण घेईल, कोणाच्या बापाची आहे का? मी सांगतो देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लाऊ शकत नाही, हे काय लेचे पेचे नेते आहे काय, असेही फडणवीसांनी म्हटले. मराठी माणसासाठी यांना बोलायचं अधिकार नाही. बाळासाहेब यांना बोलायचा अधिकार होता. त्यांची 25 वर्ष सत्ता होती, त्यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. बीडीडीचा निर्णय मी घेतला, बिल्डर येणार नाही हे मी सांगितल, आम्हीच चाव्या दिल्या. पत्रा चाळ उदाहरण आहे, यांन लाजेने मान खाली घालायला लागत आहे. मराठी अस्मिताची नाळ असलेली पत्रा चाळ आहे, यांनी घोटाळा केला. मात्र, मी मुख्यमंत्री झाल तेव्हा पत्रा चाळ घोटाळबाज लोकांच्या हातातून घेतले. तुम्ही गिरणी कामगारांसाठी मोर्चा काढला मग जेव्हा त्यांच्या जागी मोठे मोठे टॉवर होत होते, तेव्हा तुम्ही अट का घातली नाही? असा सवाल फडणवीसांनी विचारला. पालिकेतील कंत्राटदारही अमराठी ठेवले आहेत, हे काय मराठी सांगतात, हे मराठीचे राजकारण करत आहे.

अदानींना एअरपोर्टचे टेंडर कसे मिळाले?

मुंबईत अदानी आता आले नवी मुंबईच्या एयरपोर्टचे टेंडर मी काढले, त्याचे टेंडर जिविके कंपनीला गेले होते, त्यांनी त्यांचे शेअर डाइल्यूट केले आणि मग अदानींना गेले. सन 1984 साली राजीव गांधी यांनी सांगितले होते की, धारावीच विकास करायचा, ते त्यांना जमले नाही ते काम मोदीजींचे सरकार आल्यावर आम्ही सुरू केले. त्याचे वर्क ऑर्डर अदानीला दिले नव्हते, यांने यांचे सरकार आल्यावर ते काढून अदानीला दिले. त्यांनी नॉर्म्स केले ते आमही बदलले, टीडीआरच मोनोपॉली दिली, टीडीआरची किंमत रेडी ेकरने 90% केली, यांचे खायचे दात वेगळे आहे आणि दाखवायचे वेगळे आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

उद्धव ठाकरेंमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम इगोचा

उद्धव ठाकरेची मैत्री ह्यावरही फडणवीस स्पष्टच बोलले. उद्धव ठाकरे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहेत, त्यांचा प्रॉब्लम ईगो आहे. आपल्या ईगोसाठी ते आपल्या घरालाही आग लावून मज्जा करू शकतात. एक असतो आत्माभिमान जो बाळासाहेब यांच्यात होता, म्हणून शिवसेना उभी राहिल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या मैत्रीबाबतही फडणवीसांनी भूमिका मांडली. आमची वैचारिक दृष्ट्या विचार आणि भूमिका वेगळी आहे, पण एकमेकांचे शत्रू नाही. त्यामुळे 16 नंतर आम्ही चहा पिताना दिसू तर काय विचार करू नका, असेही फडणवीसांनी म्हटले.

हेही वाचा

मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर
Murlidhar Mohol : पुणेकरांचं पूर्ण समर्थन सोबत राहिल असा मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Raj Thackeray BMC Election 2026: मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Embed widget