By-Elections in Six States : सहा राज्यांतील 7 विधानसभांसाठी आज पोटनिवडणूक; प्रादेशिक पक्षांसमोर भाजपची कसोटी
By-Elections in Six States : आज सहा राज्यांतील सात विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक. उत्तर प्रदेश, हरियाणासह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष.
By-Elections in Six States : देशात सहा राज्यांतील (Maharashtra News) विधानसभेच्या (Assembly Election 2022) सात जागांसाठी आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुका (Bypoll) म्हणजे, भाजपची अग्निपरीक्षा आहे. तसेच, या पोटनिवडणुका म्हणजे, 2024 विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचंही सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात मुंबई अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपनं (BJP) या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. पण इतर ठिकाणी मात्र भाजपनं आपले उमेदवार उभे केले आहेत.
बिहारमध्ये भाजपची थेट लढत नितीश-तेजस्वी यांच्या महाआघाडीशी आहे. त्यानंतर तेलंगणात केसीआरच्या टीआरएसपासून आपली जागा वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान भाजपसमोर आहे. इतर राज्यांमध्येही प्रादेशिक पक्ष भाजपला अडचणीत आणणार आहेत. हरियाणातील (Haryana) आदमपूर विधानसभा (Adampur Assembly) मतदारसंघ हा पाच दशकांपासून भजनलाल घराण्याचा (Bhajanlal Family) बालेकिल्ला आहे, त्यामुळे भाजप हा गड आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ (Gola Gokaran Nath), हरियाणातील आदमपूर (Adampur), बिहारमधील मोकाम (Mokama) आणि गोपाळगंज (Gopalganj), महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East), तेलंगाणातील मुनुगोडे (Munugode) आणि ओदिशातील धामनगर (Dhamnagar) मधील जागेचा समावेश आहे.
कोणत्या राज्यांत पोटनिवडणूक?
उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अरविंद गिरी हे तीन वेळा समाजवादी पक्षाचे आमदारही होते. भाजपमध्ये येताना ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते.
कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते पण एके-47 बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.
सुभाष सिंह बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघातून आमदार होते. त्यांना राज्यातील एनडीए सरकारमध्ये मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके (Ramesh Latke) आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.
अंधेरी पूर्व (महाराष्ट्र)
महाराष्ट्राच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित खूपच रंजक आहे. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता ठाकरे गटाला या निवडणुकीत विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात 6 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी चार उमेदवार अपक्ष आहेत. या जागेवर भाजपनं उमेदवार जाहीर केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणासह अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अखेर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतली. या पोटनिवडणुकीत मुख्य लढत ही ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप-शिंदे गट महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल यांच्यात होती. पण आता भाजपनं माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :