Andheri Bypolls 2022 Live Updates : परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीचं आज मतदान. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके मैदानात. पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात, 6 नोव्हेंबरला निकाल

Background
Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली.
अंधेरी पोटनिवडणूकीसाठी आज मतदान. मतदारांना नोटा देऊन नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा उमेदवार ऋतुजा लटकेंचा आरोप. निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार दाखल.
अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान. 256 मतदान केंद्रांवर सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत दोन लाख 71 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार. पोलिसांसह 1600 कर्मचारी आणि CRPF च्या 5 कंपनी तैनात.
एकूण मतदान केंद्रे : 256. ही मतदान केंद्रे 38 ठिकाणी कार्यरत असणार
1 हजार पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : 163
1 हजार 250 पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : 44
256 मतदान केंद्रांपैकी 239 मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत 17 मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
Maharashtra Education : परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स (कार्यमान प्रतवारी निर्देशांक) 2020-21 मध्ये शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर राहिले आहेत. शालेय शिक्षणात भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) तसेच प्रशासकीय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राची प्रगती यातून अधोरिखित झाली आहे. पीजीआय इंडेक्समध्ये महाराष्ट्राने 1000 पैकी 928 गुण मिळून महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 च्या तुलनेत महाराष्ट्राची 59 गुणांनी वाढ झाली आहे. भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) व प्रशासकीय प्रक्रिया या गुणांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
Baramati Firing : बारामतीत जिओ पेट्रोल पंपावर फायरिंग
बारामतीत जिओ पेट्रोल पंपावर फायरिंग, दोन गटात भांडणे झाली, त्यात एकाने केलं फायरिंग.
गणेश जाधव हा पत्रकार जखमी.
बारामतीतील भिगवण रोडवरील जिओ पेट्रोल पंपावर झाली सव्वा सातच्या दरम्यान फायरिंग.
जखमीला पोटाच्या खाली गोळी लागल्याची प्राथमिक माहिती.
जखमीवर बारामतीतील बारामती रुग्णालयात उपचार सुरू.























