Amit Shah : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचं मायावती यांच्याबद्दल मोठं वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती (Mayawati) यांच्याबाबत हे वक्तव्य केले आहे.
Amit Shah : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती (Mayawati) यांच्याबाबत हे वक्तव्य केले आहे. मायावतींनी आपली प्रासंगिकता गमावलेली नाही. त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात मते मिळतील. जाटवांचे मते ही बसपाला मिळणार असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मायावती यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदशमध्ये आत्तापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. उद्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडणार आहे. यूपीमध्ये खरी लढत ही भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत बसपा प्रमुख मायावतींबाबत अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
या निवडणुकीत जाटव व्होट बँक मायावतींसोबत जाईल. मुस्लिम मतंही मायावतींसोबत मोठ्या प्रमाणात जातील,असे अमित शाह यांनी म्हटले आहे. याचा भाजपला फायदा होईल का, असेही शाह यांनी विचारले असता ते म्हणाले की, याचा भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे मला माहीत नाही. ते सीटवर अवलंबून असते. पण, मायावतींचा प्रभाव संपलेला नसल्याचे शाह यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याने मायावती यांच्याबाबत सकारात्मक विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये बहुजन समाज पक्ष आणि मायावती यांच्याविरोधात अधिक आक्रमक भूमिका दाखवलेली नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाप्रमाणेच बसपाही भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी तीन विरोधी पक्ष लढत आहेत. भाजपा 2014 (लोकसभा). 2017 (विधानसभा निवडणुका) आणि 2019 (लोकसभा निवडणुका) च्या कामगिरीची पुनरावृत्ती करू आणि बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: