एक्स्प्लोर

BJP Candidate List : लोकसभेत पराभव, आता विधानसभेत पुन्हा तिकीट, भाजपचे बडे नेते 4 महिन्यात पुन्हा निवडणुकीच्या मैदानात!

BJP Candidate List : लोकसभेत पराभव झालेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे.

BJP Candidate List : अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) पराभव झालेल्या दोन बड्या नेत्यांना भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) हे दोन उमेदवार पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुनगंटीवारांना विधानसभेसाठी बल्लारपुर आणि मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट देण्यात आलं आहे. 

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवर आणि मिहिर कोटेचा यांना पराभव झाला होता. लोकसभेसाठी मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून आणि मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून रिंगणात होते.  चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत झाली होती. 

लोकसभेचा निकाल

लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा  2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून मुनगंटीवार आमदार राहिले आहेत, त्याच बल्लारपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकरांना मताधिक्य मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये मिहीर कोटेचा यांना एकूण 4 लाख 21 हजार 076 मत मिळाली, तर संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 मत मिळाली.

विधानसभेला पुन्हा रिंगणात 

लोकसभेतील पराभवानंतर मुनगंटीवार आणि मिहिर कोटेचा हे पुन्हा एकदा विधानसभेसाठी सज्जा झालेत. मुनगंटीवारांना याच मतदारसंघातून लोकसभेला निराशा मिळाली होती. त्यामुळे मुनगंटीवारांसाठी ही लढत कठीण होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मिहिर कोटेचा यांना मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोप्पी होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. म्हणून लोकसभेला निराशा झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असल्याचं पाहायला मिळतंय.                                                   

ही बातमी वाचा : 

BJP Candidate List : "मंदा म्हात्रे, विद्या ठाकूर ते नमिता मुंदडा, भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांना तिकीट; अशोक चव्हाण यांची मुलगी भोकरमधून लढणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PMBJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोपABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget