Sharmila Pawar : मतदारांना घड्याळाच्या स्लीपचं वाटप, जीवे मारण्याच्या धमक्या; युगेंद्र पवारांच्या आईने मतदान केंद्र डोक्यावर घेतलं
Baramati Assembly constituency : बारामतीतील मतदान केंद्रावरती मतदानासाठी आलेल्या नागरिकांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात असल्याचं, त्याचबरोबर आमच्य कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात असल्याचे गंभीर आरोप शर्मिला पवार यांनी केले.
बारामती: महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे.काही मतदारसंघामध्ये गोंधळ होता आहेत, काही ठिकाणी पक्षातील कार्यकर्ते आपापसात भिडताना दिसत आहेत. अशातच बारामतीत मतदान केंद्रावरती आलेल्या मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीपचे वाटप केल्याचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार ( Yugendra Pawar) यांच्या मातोश्री शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी म्हटले असून त्यावरून त्यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचंही शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी सांगितलं. (Baramati Assembly constituency)
यावेळी बारामतीमध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी मतदारांच्या नावाच्या चिठ्ठीवर घड्याळाचा शिक्का मारलेल्या स्लीप दाखवत मी इथं आल्यावर मला हे सापडलंय. जे मतदार आले आहेत त्यांना चिठ्ठ्या दिल्या आहेत. त्यावर घड्याळाचा शिक्का मारलेला आहे. हे योग्य आहे का? आम्ही याबाबत तक्रार करणार आहे. यासंदर्भात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर देथील मतदान केंद्रावरती कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोपही शर्मिला पवार यांनी केला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मतदारांकडे चिठ्ठ्या असून त्यावर शिक्के मारून आत सोडलं. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. मी संपवतो, तुला खल्लास करतो अशी भाषा इथं सुरू आहे. हवं असेल तर तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासा असं देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांची मतदान केंद्राला भेट
शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांची मतदान केंद्राला भेट दिली. आतमध्ये जाऊन पाहणी केली, बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्याचबरोबर शर्मिला पवारांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांची मतदान केंद्राला भेट दिली. आतमध्ये जाऊन पाहणी केली, बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्याचबरोबर शर्मिला पवारांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. 'शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. तसं काही झालेलं असेल तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं असेल, निवडणूक अधिकारी चेक करतील. मी एवढ्या निवडणुका पार पाडल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहताना सुसंस्कृतपणा दाखवतो, माझा कार्यकर्ता कधीच असं वागणार नाही. माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा वापरणार नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी शर्मिला पवारांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.