Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात 2019 प्रमाणं तिरंगी लढत होत आहे. झिशान सिद्दिकी पुन्हा रिंगणात आहेत.
Bandra East Assembly Election 2024 मुंबई : मुंबईतील हाय व्होल्टेज लढत असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी पुन्हा रिंगणात आहेत. महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई रिंगणात आहेत. मनसेनं देखील या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. मनसेकडून तृप्ती सावंत रिंगणात आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं कारण उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान या मतदारसंघात आहे.
वांद्रे पूर्वला तिरंगी लढत
वांद्रे पूर्वमध्ये 2019 मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्या लढतीत झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. झिशान सिद्दिकी यांनी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी देखील पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसच्या चिन्हावर गेल्या वेळी विजयी झालेले झिशान सिद्दिकी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मविआत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं मिळवली आणि त्यांना उमेदवारी जाहीर केली.तर, या मतदारसंघाच्या माजी आमदार तृप्ती सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत.
वांद्रे पूर्वमधील उमेदवार
1. अजय कापडणे- बसपा
2. झिशान सिद्दिकी- काँग्रेस
3. तृप्ती सावंत- मनसे
4. वरुण सरदेसाई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
5.गणपत गावकर- संभाजी ब्रिगेड
6. प्रतिक जाधव- वंचित बहुजन आघाडी
7. अॅड. शिल्पा गौतम उर्फ गौतमी - राष्ट्रीय स्वराज्य सेना
8. अन्वर शेख - अपक्ष
9. कुणाल सरमळकर- अपक्ष
10. जीशान सिद्दिकी- अपक्ष
11. दिलीप शाह -अपक्ष
12. अॅड. प्रदिप बडे -अपक्ष
13. मेहमूद देशमुख - अपक्ष
14. विश्वास जाधव- अपक्ष
15 शब्बीर अब्दुल रेहमान शेख - अपक्ष
इतर बातम्या :