Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार्यांची संख्या मोठी, त्यातील 80 टक्के लोक एकट्या भाजपचे; शरद पवार यांचा मोठा दावा
मागच्या 2 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील 80 टक्के लोक हे एकट्या भाजपमधून आहेत. असा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Sharad Pawar मुंबई : भाजपचा (BJP) जन्म होण्यापूर्वी जनसंघ महत्त्वाचा पक्ष होता. त्या जनसंघाची वाढ भंडारा गोंदिया जिल्ह्यातून झाली होती. अनेक राजकीय लोक तिथून निवडून येत होते. या जिल्ह्यात वेगळी विचारधरा होती. सामान्य लोकांचे प्रश्न त्यावेळी पक्षाचा वतीने मांडणारी ही विचारधारा होती. आजचा भाजप आणि आधीचा भाजप यात मोठा फरक होता.
परिणामी, राज्यात मागच्या 2 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील 80 टक्के लोक हे एकट्या भाजपमधून आहेत. असा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. हल्ली भाजपला जोडून जात असलेले लोक अस का करत आहेत? तर त्याच कारण असं होतं की, पक्षात पूर्वीसारखी शिस्त राहिली नाही. असं भाजपचे एक नेते जे माझे मित्र आहेत ते सांगत होते. भाजपमधील आताचे नेतृत्व पाहता आधी जी शिस्त होती ती आताच्या नेतृत्वाकडून पाहायला मिळत नाही. त्यामुळे असं घडत असल्याचेही शरद पवार म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा- शरद पवार
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. तर दुसरीकडे या हत्येची सर्वस्वी जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान, या घटनेवर शरद पवार यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. बाबा सिद्दिकी यांची हत्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असून याची चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारावी आणि सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
काय म्हणाले शरद पवार?
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
हे ही वाचा