भाजप-शिवसेनेमध्ये बंडखोरांवरुन रस्सीखेच, रवी राणा आणि गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा
अमरावतीतील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेनेतील अनेकांनी तिकीट वाटपावरुन नाराजी व्यक्त बंडखोरी केली होती. त्यातील काही जण निवडणुकीत निवडूनही आले आहेत. या बंडखोरांच्या समर्थनासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, गीता जैन यांनी निकाल लागल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. बंडखोरांना युतीत स्थान दिलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी म्हटलं होतं. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेची गणितं जुळवण्यासाठी आता बंडखोरांचा भाव वधारला असल्याचं दिसत आहे.
VIDEO | निकालाचे आकडे बदलले, शिवसेना नेत्यांची भाषाही बदलली | स्पेशल रिपोर्ट
रवी राणा आणि राजेंद्र राऊत यांचा भाजपला पाठिंबा
अमरावतीमधील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. रवी राणा यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रिती बंड यांचा पराभव करत आमदारकीची हॅटट्रिक मारली आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला.
बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. तर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही शिवसेनेला समर्थन दिलं आहे.
VIDEO | भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजू शकत नाही : उद्धव ठाकरे
संबंधित बातम्या
- मुख्यमंत्रीपद आमची प्रथम मागणी, उपमुख्यमंत्रीपद नंतरचा विषय : शिवसेना
- महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल, तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती : संजय राऊत
- भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे
- भाजप अध्यक्ष अमित शाह 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंना भेटणार का? याकडे सर्वांच लक्ष
- शिवसेनेची ताकद वाढली, बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा
- 'शेर कितना भी भूखा हो घास नहीं खाता', मुख्यमंत्रीपदाबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य