एक्स्प्लोर

Sunil Tingre: सुनील टिंगरेंना अजित पवारांचा फोन; म्हणाले, वडगाव शेरीतून लढायच्या तयारीला लागा!

vadgaon sheri vidhan sabha: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे.

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 38 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली होती. या उमेदवारी यादीत वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांची धाकधूक वाढल्याची चर्चा होती. महायुतीमध्ये ज्या मतदार संघाचा निर्णय अजूनही झालेला नाही त्यात पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघ (vadgaon sheri vidhan sabha) समावेश आहे. अजित पवार पक्षाकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे . त्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे नाव नव्हते. मात्र, त्यांना पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. सुनील टिंगरे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली आहे. वडगाव शेरीच्या जागेवर माझाच दावा आहे . काल रात्री मला अजित पवारांचा फोन आला होता. आज संध्याकाळपर्यंत दुसरी यादी येईल. या यादीत माझं नाव असेल, असा मला विश्वास असल्याचे टिंगरे यांनी सांगितले. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकही इच्छूक आहेत. यावर बोलताना टिंगरे यांनी म्हटले की, असे अनेक जण इच्छुक असतात, ते सुद्धा तयारी करतात. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकत नाही. इतर मतदारसंघांमध्ये देखील यामुळे अडचण होऊ शकते, असा गर्भित इशारा सुनील टिंगरे यांनी दिला.

अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 38 उमेदवारांची नावे

बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
 कागल- हसन मुश्रीफ 
परळी- धनंजय मुंडे
 दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन-  आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
 उदगीर- संजय बनसोडे 
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
 सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
 अहमदनगर शहर- संग्राम जगताप
 इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
 शहापूर- दौलत दरोडा
 पिंपरी- अण्णा बनसोडे
 कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
 अकोले - किरण लहामटे
 वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
 चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
 हडपसर- चेतन तुपे
 देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेस पाटील
 इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
 अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
 पाथरी- निर्णला विटेकर

आणखी वाचा

मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget