एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation | शिवसेना एनडीएतून बाहेर, अरविंद सावंत यांचा राजीनामा

"शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावं आणि केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीची आहे. तसंच पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेने प्रस्ताव देण्याचाही पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मुंबई : शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडली आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवला आहे. "भाजपने लोकसभेला दिलेला शब्द विधानसभा निवडणुकीनंतर पाळला नाही. त्यामुळे अशा वातावरणात काम करणं योग्य नाही," असं अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असताना, घडामोडी वेगाने घडत आहेत. स्वत: अरविंद सावंत यांनीच ट्वीट करुन आपण राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. "खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे," असं सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला सहजासहजी पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अट ठेवली आहे. "शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावं आणि केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीची आहे. तसंच पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेने प्रस्ताव देण्याचाही पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. अरविंद सावंत यांचं ट्वीट अरविंद सावंत यांनी सकाळी ट्वीट करुन राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे."
अधिक पाहा..

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
ABP Premium

व्हिडीओ

Ideas of India 2025 : एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक Atideb Sarkar यांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?Manoj Jarange Parbhani : सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार? मनोज जरांगेंनी सांगितली तारीख

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीकडून 164550 कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे किती संपत्ती राहिली?
अमेझॉनच्या मालकाच्या घटस्फोटित पत्नीकडून दीड लाख कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे इतकी संपत्ती शिल्लक
Sanjay Raut : अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Satara News : माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
Embed widget