UGC NET 2023 Result: प्रतीक्षा संपली! यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज, यूजीसी अध्यक्षांचं ट्वीट
UGC NET Result 2023: UGC NET परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.
![UGC NET 2023 Result: प्रतीक्षा संपली! यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज, यूजीसी अध्यक्षांचं ट्वीट UGC NET 2023 Result declared by today at ugcnet nta nic in check know details UGC NET 2023 Result: प्रतीक्षा संपली! यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज, यूजीसी अध्यक्षांचं ट्वीट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/e66ba19fbd0de9c75a857d9864c7bf2d167948388120076_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UGC NET Result 2023: यूजीसी नेट (UGC NET) डिसेंबरच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) आज म्हणजेच, 13 एप्रिल रोजी UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर निकाल पाहु शकतील. निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
UGC NET डिसेंबर 2022 परीक्षा देशभरात स्थापन केलेल्या केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. यंदा परीक्षेसाठी 650 हून अधिक केंद्र स्थापन करण्यात आली होती. ही परीक्षा 32 शिफ्टमध्ये 16 दिवसांत 83 विषयांसाठी 5 टप्प्यांत घेण्यात आली. UGC NET परीक्षेत 8.34 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर परीक्षेची प्रोविजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. प्रोविजनल उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पुनरावलोकनानंतर, NTA ने तात्पुरती अंतिम उत्तर पत्रिका जारी केली होती. तेव्हापासूनच उमेदवार निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवार खालील स्टेप्सद्वारे निकाल देखील पाहू शकतात.
NTA will announce UGC-NET results by tomorrow. For details, you may please visit https://t.co/M3TNVmUeco
— Mamidala Jagadesh Kumar (@mamidala90) April 12, 2023
आज जाहीर होणाऱ्या निकालांबाबत स्वतः यूजीसी अध्यक्ष एम. जगदीश कुमार (Mamidala Jagadesh Kumar) यांनी माहिती दिली. यूजीसी अध्यक्षांनी यासदंर्भात ट्वीट करून परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्यासंदर्भात माहिती दिली आहे. यूजीसी अध्यक्षांनी ट्वीट केलं की, एनटीए (NTA) उद्यापर्यंत (13 एप्रिल) यूजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा निकाल जाहीर करेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही https://ugcnet.nta.nic.in ला भेट देऊ शकता.
कसा चेक कराल निकाल?
स्टेप 1: सर्व उमेदवारांनी प्रथम UGC NET च्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : नंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : यानंतर, तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉग इन करा.
स्टेप 4 : तुमच्या स्क्रिनवर तुम्हाला निकाल दिसेल.
स्टेप 5 : तिथे तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय दिसेल, तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करु शकता.
स्टेप 6 : डाऊनलोड झाल्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)