SSC HSC Exam : दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर? शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका
SSC HSC Exam : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी होणार असल्याने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी बारावीच्या परीक्षा आणि निकालांना बसणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मागील महिन्यात देखील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर आणि कामावर बहिष्कार घातला होता. आताही 14 मार्चपासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात आलाय. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो तोच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त निघेपर्यंत शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. शिवाय राज्य शिक्षण मंडळात पार पडणाऱ्या मुख्य नियामकांच्या बैठकीवरही शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. इतिवृत्त आल्यावर या शिक्षकांनी वेगाने उत्तरपत्रिका तपासायला सुरुवात केली. मात्र आता पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीला ब्रेक लागणार आहे.
संपात सहभागी शिक्षक संघटना
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ.
Bhandara SSC Exam : घरी बापाचा मृतदेह, धैर्य दाखवून लेक दहावीच्या परीक्षेला; भंडाऱ्याच्या प्राचीचा धीरोदात्तपणा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI