एक्स्प्लोर

Mira Road: अपंगत्वावर मात करत दहावीच्या परिक्षेत मिळवलं घवघवीत यश; मांताशा हुसैनच्या जिद्दीची अनोखी कहाणी

SSC Result 2023: मांताशा इरफान हुसैन हिने आपल्या अपंगत्वावर मात करुन दहावीत 81 टक्के मिळवले आहेत. दिव्यांग मुलांसाठी ती एक प्रेरणा बनली आहे.

SSC Result 2023: आपल्या अपंगत्वावर मात करत मिरा रोडच्या मांताशा हुसैन या मुलीने दहावीत 81 टक्के मार्क मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांगावर हताश होऊन अर्धवट शिक्षण सोडलेल्या आपल्याच मित्रांना तिने जिद्दीने यश कसं मिळवायचं याचा आदर्शच समोर ठेवला आहे. 

मांताशा इरफान हुसैन हिच्या 90 टक्के शरीराने तिला साथ न देण्याचं जन्मतःच ठरवलं होतं, मात्र तिने घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने यशाचं शिखर गाठलं आहे. तिने कधीच हार मानली नाही आणि दहावीत 81 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन समाजासमोर आणि दिव्यांग मुलांसमोर एक आदर्शच उभा केला आहे. मिरा रोडच्या आश्मी प्लाझा या सोसायटीत मांताशा आपल्या आई-वडिलांसह राहते. मांताशा जन्मत: दिव्यांग आहे, तिला सी.पी. म्हणजेच, स्पस्टिक क्वाड्रिप्लेजिक सेरेब्रल पाल्सी (spastic Quardriplegic Cerbral palsy) हा आजार जन्मतःच होता. 

या आजारात तिचे दोन्ही हात आणि पाय काम करत नाही, तिचे 90 टक्के शरीर अंपग आहे. दिव्यांग असूनही मांताशा लहानपणापासून फारच सकारात्मक आहे. तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. आठवीपर्यंतचं शिक्षण तिने मिरा रोडच्या सेंट अँन्थोनी शाळेतून घेतलं. आठवीनंतर दुसऱ्या मजल्यावर वर्ग गेल्याने तिने घरुनच शिक्षण घेण्याच ठरवलं.

मांताशाचे वडील तिला बाईकवर बसवून शाळेत सोडायचे. शाळेत तिच्यासाठी स्वतंत्र अशी खुर्ची बनवण्यात आली होती, तिच्या घरी देखील तिला स्वतंत्र खुर्ची बनवण्यात आली आहे. पुढे अभिनव कॉलेजमधून तिने दहावीचा प्राइव्हेट फॉर्म भरुन राईटरच्या (Writer) मदतीने दहावीचा पेपर दिला आणि तिला घवघवीत यश मिळालं. तिच्या या यशाने आई-वडिलांसह ती स्वत: खूप खुश आहे. मांताशाला आता स्टॉक मार्केटमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे.

ठाण्यातील सिग्नल शाळेच्या मुलाचीही अशीच कहाणी

 ठाण्यातील सिग्‍नलवर पुर्वाश्रमी आणि भिक्षेकरी मुलांची एक शाळा भरते आणि त्याच शाळेचा विद्यार्थी किरण काळे दहावीची परिक्षा 60 टक्क्‍यांनी उत्‍तीर्ण झाला. वडील नसलेला किरण काळे आठ वर्षांचा असताना सिग्‍नल शाळेत दाखल झाला होता.  ठाण्याच्या तीन हात नाक्‍याखाली वडील नसलेला किरण आपल्‍या आईसोबत निर्वासित आयुष्‍य जगत होता. सिग्‍नल शाळेमुळे वयाच्‍या आठव्‍या वर्षी त्‍याला शाळेचे विश्‍व गवसले. किरणची आई मीना काळे ही निरक्षर असून गोखले रोडवर गजरे विकण्‍याचा व्‍यवसाय करते. पुढील शिक्षण घेऊन पोलीस ऑफिसर बनण्याचे किरणचे स्वप्न आहे. त्याला चांगले शिकून आईसाठी एक घर घ्‍यायचे आहे.

सविस्तर वाचा:

Thane: सरस्‍वती सेकंडरी व्‍हाया सिग्‍नल शाळा; किरण काळे दहावीत 60 टक्‍यांनी उत्‍तीर्ण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेसैनिकांचा काही तासात 'खळ-खट्याक'; मनसेकडून पनवेलमध्ये लेडीज बारची तोडफोड
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेसैनिकांचा 'खळ-खट्याक'; मनसेकडून पनवेलमध्ये लेडीज बारची तोडफोड
Maharashtra Live blog: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी
Maharashtra Live blog: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी
Video :  कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
Jalna crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेसैनिकांचा काही तासात 'खळ-खट्याक'; मनसेकडून पनवेलमध्ये लेडीज बारची तोडफोड
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेसैनिकांचा 'खळ-खट्याक'; मनसेकडून पनवेलमध्ये लेडीज बारची तोडफोड
Maharashtra Live blog: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी
Maharashtra Live blog: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी
Video :  कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
Jalna crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
ह्रदयद्रावक घटना... संभाजीनगरमध्ये बांधकामासाठी खांदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू
ह्रदयद्रावक घटना... संभाजीनगरमध्ये बांधकामासाठी खांदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू
संतापजनक! लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन; दारू पिऊन उद्धटपणा, अरेरावी
संतापजनक! लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन; दारू पिऊन उद्धटपणा, अरेरावी
Meghana Bordikar: ग्रामसेवक मोलमजुरी करणाऱ्या आणि विधवा महिलांचा छळ करतो म्हणून तशी भाषा वापरली, व्हायरल व्हिडीओनंतर मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण
ग्रामसेवक विधवा महिलांचा छळ करतो, पैसे मागतो म्हणून तशी भाषा वापरली, मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget