SSC & HSC Exam : मोठी बातमी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ
SSC, HSC Exam Application : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
SSC, HSC Exam Application : दहावी ( SSC Board Exam) आणि बारावीच्या ( HSC Board Exam ) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज ( Application form ) दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बोर्डाने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर असणार आहे आणि बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
दहावी, बारावी परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी आता 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत असेल याआधी ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत होती, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. बारावी बोर्ड परीक्षेसाठी याआधीची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत होती. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक असून बोर्डाकडून निश्चित वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा संभाव्य सविस्तर वेळापत्रक
- 2 मार्च - प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
- 3 मार्च - द्वितीय वा तृतीय भाषा
- 6 मार्च - इंग्रजी
- 9 मार्च - हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
- 11 मार्च - संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
- 13 मार्च - गणित भाग - 1
- 15 मार्च - गणित भाग 2
- 17 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
- 20 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
- 23 मार्च - सामाजिक शास्त्र पेपर 1
- 25 मार्च - सामाजिक शास्त्र पेपर 2
बारावी परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक जाहीर
- 21 फेब्रुवारी - इंग्रजी
- 22 फेब्रुवारी - हिंदी
- 23 फेब्रुवारी - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
- 24 फेब्रुवारी - संस्कृत
- 27 फेब्रुवारी - फिजिक्स
- 1 मार्च - केमिस्ट्री
- 3 मार्च - मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स
- 7 मार्च - बायोलॉजी
- 9 मार्च - जियोलॉजी
- 25 फेब्रुवारी- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट
- 28 फेब्रुवारी - सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
- 1 मार्च - राज्यशास्त्र
- 13मार्च - ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
- 15 मार्च - ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
- 9 मार्च - अर्थशास्त्र
- 10 मार्च - बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
- 13 मार्च - बँकिंग पेपर - 1
- 15 मार्च - बँकिंग पेपर - 2
- 16 मार्च - भूगोल
- 17 मार्च - इतिहास
- 20 मार्च - समाजशास्त्र
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI