एक्स्प्लोर

डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा, पाच वर्षांची प्रतिक्षा संपली

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आठ फेब्रुवारी अशी आहे. 

Maha TAIT Exam 2023 : पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) घोषणा आज झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) होणार आहे. उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. (Maharashtra TAIT Exam Notification Out )

मागील पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) केव्हा होणार? असा प्रश्न डीएड (D.Ed) आणि बीएड (B.Ed) उमेदवारांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांच्या तारखांची आज घोषणा (Maharashtra TAIT Exam Notification Out) करण्यात आली आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आठ फेब्रुवारी अशी आहे. 

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने 2017 मध्ये घेतला होता.  त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये TAIT परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत.  मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.

वेळापत्रक काय आहे?
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
- प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी-  15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
- ऑनलाईन परीक्षा तारखा - 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.) 

आणखी वाचा :
Job Majha : दहावी पास आहात? भारतीय पोस्ट खाते आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, अजा करा अर्ज 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Embed widget