India Post Recruitment 2021 : पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती; पोस्टमनसह अनेक पदांसाठी परिपत्रक जारी
India Post Recruitment 2021 : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची नामी संधी. पोस्टमनसह अनेक पदांसाठी परिपत्रक जारी. दहावी, बारावी पास असलेले करु शकतात अर्ज.
India Post Recruitment 2021 : पोस्ट विभाग, मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कलनं त्यांची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर 60 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, या भरती प्रक्रियेतून पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती 'स्पोर्ट्स कोटा' अंतर्गत गुणवंत 'खेळाडूं'च्या थेट भरतीसाठी आहे.
अधिकृत परिपत्रकानुसार, पोस्टल असिस्टंटची 31 पदं, सॉर्टिंग असिस्टंटची 11 पदं, पोस्टमनची 5 पदं आणि मल्टी टास्किंग स्टाफची 13 पदं रिक्त आहेत. पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण झालेला असावा.
पोस्टमन पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2021 पासून मोजण्यात येईल.
दरम्यान, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार, सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून विहित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Central Bank Recruitment 2021 : सेंट्रल बँकेत शेकडो पदांची भरती; 17 डिसेंबरपर्यंत करा अर्ज
- Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज
- Job Majha : मुंबई महापालिका, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी
- JOB Majha : राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान आणि नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे नोकरीची संधी
- AIIMS Recruitment 2021 : एम्स नागपूरमध्ये प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसरसह एकूण 32 पदांसाठी भरती; असा करा अर्ज
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI