(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Education : 'आयआयबी'ची कमाल, चार विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी गुण
IIB Education : आयआयबीने भन्नाट कामगिरी केली आहे. येथील चार विद्यार्थ्यांना नीट परिक्षेत पिजिक्स विषयामध्ये 180 पैकी 180 गुण मिळाले आहेत.
IIB Education : आयआयबीने भन्नाट कामगिरी केली आहे. येथील चार विद्यार्थ्यांना नीट परिक्षेत पिजिक्स विषयामध्ये 180 पैकी 180 गुण मिळाले आहेत. नीट परीक्षेचा यंदाचा निकाल नुकताच लागला. या निकालात आयआयबीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आयआयबीने मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडीत केली. आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या परीक्षेत आयआयबीच्या अनिमेश राऊत 692 गुणांसह महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर पारस सूर्यवंशी 690, श्रुती वीर 690, आदित्य केंद्रे 690 ,गौरव शिंदे 685, सौरभ दुघे 681, सक्षम करंडे 680, हर्षल बोकाडे 680 असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीट च्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर,शिवम सुर्यवंशी या विद्यार्थ्यांनी 180 पैकी 180 गुण प्राप्त केले आहेत. या सर्वांचा आयआयबीच्या वतीने पालकांसोबत एका कार्यक्रमात गौरव केला.
यावेळी गुणवंताच्या गौरव सभारंभाचे प्रास्ताविक आयआयबी पीसीबी चे अकॅडेमिक संचालक प्रा. वाकोडे पाटील यांनी तर मार्गदर्शन संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले. शेख सादिक यांनी आयआयबी च्या आत्तापर्यंतच्या यशाचा आढावा उपस्थितांच्या समोर मांडला. योसोबतच नीटमध्ये 550 हून अधिक गुण मिळवणाऱ्या तब्बल 375 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी आयआयबीकडून करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा म्हणून बक्षिसांचे प्रदानही यावेळी करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. गुणवंताच्या गौरव सोहळ्यासाठी व्यवस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीम आयआयबीच्या सर्व आयआयबी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहेत.
आयआयबीने राबवलेल्या पीसीबी पॅटर्नमुळे परराज्यात जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा थांबला आहे. आयआयबीमुळे इतर राज्यातून विद्यार्थी नांदेड लातूर आणि पुणे येथे नीट परिक्षाच्याच्या तयारीसाठी दाखल होत आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होतोय. मेस चालक, हॉस्टेल चालक, हॉटेल चालक यासह अनेकांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. आता वर्षानुवर्षे हे आयआयबीच्या निकाला सोबत वाढतच जाईल असा विश्वास या क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा :
Currency Note : किंग जॉर्ज, अशोक स्तंभ ते महात्मा गांधी... असा आहे भारतीय नोटांवरील चित्रांचा प्रवास
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI