(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICAI ने CA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर, 'या' तारखेपासून होणार परीक्षा, जाणून घ्या
ICAI CA Foundation 2022: विद्यार्थी 14 सप्टेंबरपासून यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट icai.org ला भेट द्यावी लागेल.
ICAI CA Foundation 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, ICAI ने CA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ICAI ने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, CA फाउंडेशन डिसेंबर सत्रासाठी 14, 16, 18 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी 14 सप्टेंबरपासून यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट icai.org ला भेट द्यावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर आहे. त्याच वेळी, उमेदवारांसाठी अर्जातील दुरुस्तीची विंडो 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सुरू केली जाईल.
नोंदणी शुल्क
उमेदवारांना नोंदणी शुल्क म्हणून 1500 रुपये शुल्क भरावे लागेल. 600 रुपये किंवा US$ 10 च्या विलंब शुल्कासह ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. परदेशी उमेदवारांना नोंदणी शुल्क म्हणून USD 325 आणि भूतान आणि काठमांडू केंद्रांसाठी 2200 रुपये आकारले जातील.
277 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार
या वर्षी सीए फाउंडेशनची परीक्षा देशभरातील 29 शहरांमध्ये आणि 8 परदेशातील 277 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परदेशातील शहरांमध्ये अबुधाबी, दुबई, काठमांडू, बहरीन, थिम्पू, मस्कत, दोहा आणि कुवेत यांचा समावेश आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत परीक्षा होईल. त्याच वेळी पेपर 3 आणि पेपर 4 अनुक्रमे 2:00 ते 4:00 वाजे दरम्यान दोन तासांसाठी असेल. परीक्षेशी संबंधित माहितीसाठी, ICAI च्या अधिकृत वेबसाइटला icai.org भेट द्या अबुधाबी, दुबई आणि मस्कत केंद्रांवर परीक्षेची सुरुवात होण्याची वेळ दुपारी 12.30 वाजता असेल. बहारीन, दोहा आणि कुवेत केंद्रावर परीक्षेची सुरुवात होण्याची वेळ सकाळी 11.30 असेल. काठमांडू (नेपाळ) केंद्रावर परीक्षा सुरू होण्याची वेळ दुपारी 2.15, नेपाळ स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता असेल. त्याच वेळी, थिम्पू (भूतान) केंद्रावर परीक्षा सुरू होण्याची वेळ भूतानच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
JEE Advanced Result 2022: IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला, 29 विद्यार्थी टॉप 100 मध्ये
JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' डाउनलोड करा निकाल, जाणून घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI