एक्स्प्लोर

JEE Advanced Result 2022: IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला, 29 विद्यार्थी टॉप 100 मध्ये

JEE Advanced Result 2022: JEE Advanced 2022 निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे

JEE Advanced Result 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

IIT मुंबई झोनचा आर. के. शिशिर देशात प्रथम

JEE Advanced 2022 निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे. तर आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही देशातून मुलींमध्ये प्रथक क्रमांकावर आहे. आयआयटी मुंबई झोनचे 29 विद्यार्थ्यांनी देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबई झोनच्या आर.के. शिशिरने 360 पैकी 314 गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे

IIT मुंबई झोन मधील देशातील (टॉप 20) मध्ये येणाऱ्या टॉपर्सची नावे - 

आर. के. शिशिर - रँक 1 
प्रतीक साहू - रँक 7
माहीत गढीवाला - रँक 9
विशाल बयसानी - रँक13
अरिहंत वशिष्ठ - रँक 17

JEE Advanced 2022 परीक्षेत कोण  ठरले अव्वल?
JEE Advanced 2022 RK शिशिरने JEE Advanced मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तनिष्का काबरा मुलींमध्ये अव्वल ठरली आहे. तर या परीक्षेत 40712 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. देशभरातील 23 IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी मुले बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बी.टेक आणि इतर तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

परीक्षेसाठी एकूण 1,55,538 विद्यार्थी बसले
JEE Advanced 2022 परीक्षेसाठी एकूण 1,55,538 विद्यार्थी बसले होते त्यातील 40,172 विद्यार्थी हे पुढील प्रवेश साठी पात्र ठरले आहे. या परीक्षेत 360 पैकी 55 गुण हे पात्रतेसाठी आवश्यक आहे. त्यानुसार हे 40,172 विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

124 शहरांमध्ये 577 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली

28 ऑगस्ट रोजी जेईई अॅडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ 1.56 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 124 शहरांमध्ये 577 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये एकूण 16,598 जागा आहेत, ज्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जागांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी 1,567 अतिरिक्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण जागांची संख्या 2021 मधील 16,232 वरून यावर्षी 16,598 पर्यंत वाढली आहे.

निकाल असा डाउनलोड करा

सर्व प्रथम, JEE Advanced च्या jeeadv.ac.in अधिकृत साईटला भेट द्या.

यानंतर, उमेदवार होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.

नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा

उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

संबंधित बातम्या

JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल जाहीर; असा' डाउनलोड करा निकाल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget