Saral Portal : राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही, सरल प्रणालीत माहिती भरताना शिक्षकांची डोकेदुखी वाढली
Saral Portal : राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे.
Saral Portal : राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड (Aadhaar Card) नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) समोर आली आहे. तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये (Saral Portal) विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधार कार्ड नोंदणी गरजेची आहे.
दरवर्षी राज्यातील शिक्षकांकडून सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. मागील तीन महिन्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचं काम करत आहेत. सरल प्रणालीमध्ये माहिती भरत असताना यामध्ये विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सुद्धा गरजेची आहे. मात्र शिक्षण विभागाकडून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तब्बल साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने सरल प्रणालीमध्ये त्यांची नोंद करण्याचं काम अडलं आहे. सरल प्रणालीमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीनुसार शिक्षकांचे सुद्धा समायोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून केलं आहे.
सरल प्रणालीमध्ये 39 लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होईना
तर 39 लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होत नाही. याची मुख्य तीन कारणं समोर आली आहेत.
*आधार कार्ड तयार नाहीत (Aadhaar Card Not Generated)
*आधार कार्ड शाळांना, शिक्षकांना दिलेले नाही (Aadhaar Card Not Reported)
*आधार कार्डमधील माहिती जुळत नाही (Aadhaar Card Information Mismatch)
30 नोव्हेंबरची मुदत वाढवण्याची शिक्षकांची मागणी
आता या विद्यार्थ्यांच्या सरळ प्रणाली मध्ये आधार कार्ड नोंदणी कशा करायची, असा प्रश्न आता शिक्षकांसमोर उभा आहे. सरल प्रणातील विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. परंतु 30 नोव्हेंबरची मुदत वाढवण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. शिवाय यावर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या त्या भागात विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करुन पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
एका क्लिकवर विद्यार्थ्यांची माहिती
शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळा स्तरावरुन वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करुन वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बराच वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन ही वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसंच या प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.
संबंधित बातमी
Aadhaar Card: बनावट 'आधार कार्ड'वर बसणार चाप, सरकारनं घेतला मोठा निर्णय
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI