एक्स्प्लोर

Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

Baba Ram Rahim: राम रहीम अनेकवेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. यावेळी 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

Baba Ram Rahim: दोन साध्वींवर बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जिल्हा तुरुंगात आहे. पॅरोल कालावधीत तो हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदात राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीमची पॅरोल काल संध्याकाळी मंजूर करण्यात आली. त्यानंतर, तुरुंग प्रशासनाने त्यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. पॅरोल दरम्यान, राम रहीम यांना अटींचे पालन करावे लागेल आणि सिरसा डेरा परिसराबाहेरील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. प्रशासनाकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

अनेकवेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगातून बाहेर प 

गुरमीत राम रहीम 2017 पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत. दोन साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणीही दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणांपासून, राम रहीम अनेकवेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. यावेळी 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी राम रहीमला निवडणुकीच्या काळात पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रशासनाने सांगितले की नियम आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पॅरोल कालावधी पूर्ण झाल्यानंतर, गुरमीत राम रहीमला पुन्हा सुनारिया तुरुंगात शरण जावे लागेल.

शिक्षेतील जवळपास सव्वा वर्ष पॅरोलवर

25 ऑगस्ट 2017 रोजी, राम रहीमला त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात पहिल्यांदाच दोषी ठरवण्यात आले आणि त्याच दिवशी तो पहिल्यांदा तुरुंगात गेला. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. दोन वर्षांनंतर, 11 जानेवारी  2019 रोजी, तो पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी दोषी आढळला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 ते 4 जानेवारी 2025 पर्यंतच्या त्याच्या शिक्षेचा हिशोब केला तर त्याने अंदाजे 8 वर्षे शिक्षा भोगली आहे. पण उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पॅरोल आणि फर्लोमुळे त्याने या 8 वर्षांपैकी एक वर्षापेक्षा जास्त काळ बाहेरगावी आनंद लुटण्यात घालवला आहे. तर यावेळी मिळालेल्या 40 दिवसांच्या पॅरोलची भर घातली तर तो तुरुंगाबाहेर आल्यापासून 400 हून अधिक दिवस होतील.   तुरुंगात गेल्यानंतर सुमारे 5 वर्षे त्यालाही इतर कैद्यांप्रमाणे अधूनमधून पॅरोल मिळत राहिला, परंतु 2022 मध्ये जेव्हा हरियाणा सरकारने 'हरियाणा गुड कंडक्ट टेम्पररी प्रिझनर्स अ‍ॅक्ट'मध्ये सुधारणा केली तेव्हा फक्त राम रहीमनला जॅकपॉट लागला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget