एक्स्प्लोर

Aadhaar Card: बनावट 'आधार कार्ड'वर बसणार चाप, सरकारनं घेतला मोठा निर्णय

Aadhaar Card News: बनावट आधार कार्डवर (Fake Aadhaar Card) चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

Aadhaar Card News: बनावट आधार कार्डवर (Fake Aadhaar Card) चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी व्हेरिफिकेशन (पडताळणी) करणे गरजेचं आहे, असे आयटी मंत्रालयानं सांगितलं. आधार कार्ड संदर्भात गुरुवारी UIDAI ने नियमावली जारी केली आहे. यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संस्थांनी पडताळणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलेय. 

आधार कार्डची पडताळणी कशी होईल?
UIDAIने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले की, आधार कार्ड जमा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करावी.  एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधारचा (आधार कार्ड, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे. त्यासाठी mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधारची पडताळणी केली जाऊ शकते.  QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोनवरील अॅप्लिकेशनसाठी विनामूल्य आहे.

बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card) तयार केल्यास होऊ शकतो दंड -
आधार कार्डची पडताळणी केल्यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे  कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही, या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो.  बनावट आधार कार्ड तयार करणे अथवा आधारशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे.   आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत तो व्यक्ती दंडास पात्र आहे.

UIDAIचे राज्यांना आवश्यक निर्देश 
युआयडीएआयने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर  भर देण्याची  राज्य सरकारांना विनंती केली आहे. याबाबत राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून  आधार कार्ड सादर केले जाईल - तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी  केली  जाईल. युआयडीएआयने  संस्थाना  प्रमाणीकरण/पडताळणीसाठी  विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत. ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि  प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी  आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Chandrayaan 4 : चांद्रयान -4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Chandrayaan 4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Sanjay Raut : अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 1 PM : 16 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRam Satpute And Ranjit Singh Naik Nimbalkar  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय : ABP MajhaUdayanraje Bhosale : उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर : ABP MajhaVishal Patil Sangli Lok Sabha : आज विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Chandrayaan 4 : चांद्रयान -4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Chandrayaan 4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Sanjay Raut : अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
ज्यांविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
ज्यांविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
Vishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटील
Vishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटील
Travel : मूड फ्रेश होईल..जेव्हा उन्हाळ्यात हिल स्टेशन फिरण्याची इच्छा होईल पूर्ण! भारतीय रेल्वेचे स्वस्त पॅकेज एकदा पाहाच
Travel : मूड फ्रेश होईल..जेव्हा उन्हाळ्यात हिल स्टेशन फिरण्याची इच्छा होईल पूर्ण! भारतीय रेल्वेचे स्वस्त पॅकेज एकदा पाहाच
'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'; मॅक्सवेलने माघार घेतली, त्यामगचं कारणही सांगितलं!
RCB vs SRH: 'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'; मॅक्सवेलने माघार घेतली, त्यामगचं कारणही सांगितलं!
Embed widget