Education : परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? तर या टिप्स फॉलो करा, तुम्हाला नक्की प्रवेश मिळेल!
Study In Foreign Universities : जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर प्रथम त्या गोष्टी जाणून घ्या, त्यानंतर परदेशात शिक्षण घेणे सोपे होईल.
Study In Foreign Universities : अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी (Foreign Education) जाण्याची इच्छा असते. पण यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागते. तिथल्या प्रवेशाची पद्धत, कागदपत्रांची आवश्यकता आणि खर्च संपूर्ण भारताच्या (India) तुलनेत खूप वेगळा आहे. इतकेच नाही तर तेथे प्रवेशासाठी व्हिसा, पासपोर्ट, शिष्यवृत्ती या मूलभूत गरजांची व्यवस्था करूनही अनेक मुद्द्यांवर काम करावे लागते. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळवू शकता. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर प्रथम त्या गोष्टी जाणून घ्या, त्यानंतर परदेशात शिक्षण घेणे सोपे होईल.
जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी...
-तुम्ही कोणत्या कोर्स-कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहात याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. उदाहरणार्थ- तुम्हाला कोर्समध्ये कोणते विशेष विषय हवे आहेत? कोर्सचा कालावधी किती असेल? कॉलेज कसे आहेय़ तेथील फॅकल्टी कशी आहे?
-त्याचबरोबर तुम्ही ज्या देशात शिक्षण घेणार आहात, तो देश भारतापासून किती दूर आहे? दळणवळणाच्या साधनांची कमतरता नाही, सुरक्षितता आणि हवामान कसे आहे? हेही लक्षात ठेवा.
-तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहात, ते शिष्यवृत्ती देत आहे का? याची माहिती घ्या. तसे असल्यास, त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
-अनेक महाविद्यालये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवतात. त्यामध्ये तेथे पोहोचण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही प्रकारच्या सेवांचा समावेश होतो. यामध्ये व्हिसा मिळविण्यासाठी मदत आणि नवीन देशात राहण्याची सुविधा देखील दिली जाते. तसे असल्यास, अगोदर शोधा जेणेकरून तुम्हाला त्यांचा पुरेपूर फायदा घेता येईल.
-जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवून परदेशात शिक्षण घेणार असाल तर, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात त्या कॉलेजचे प्लेसमेंटचे निकष काय आहेत? याची खात्री करा. कोणत्या कंपन्या तेथे येतात. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास परदेशात शिक्षण घेणे सोपे होईल.
-प्रत्येक विद्यापीठाचे आणि अभ्यासक्रमाचे नियम वेगवेगळे असले, तरी एक मूलभूत नियम असा आहे की, तुम्ही प्रवेशासाठी अर्ज करत असलेल्या देशाची भाषा तुम्हाला अवगत असावी.
-अनेक ठिकाणी TOEFL आणि IELTS इत्यादी काही परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे दाखवावी लागतात. त्यामुळे प्रवेश मिळणे सोपे होते.
-इंग्रजी भाषिक देशांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे विशेषतः महत्वाचे आहे. अशीच एक परीक्षा म्हणजे केंब्रिज परीक्षा ज्यामध्ये ग्रेड किंवा स्कोअर नाही, थेट पास किंवा नापास आहेत.
-सहसा महाविद्यालयाकडून दोन शिफारस पत्रे विचारली जातात. ही पत्रे प्रामुख्याने तुमच्या शैक्षणिक वर्तनाबद्दल आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल सांगतात. तुमची कंपनी, वरिष्ठ किंवा शिक्षक ही पत्रे देतात. तुमची निवड या पत्राच्या आधारे केली जाते आणि या माहितीचीही पडताळणी केली जाते.
-परदेशात शिक्षण घेण्यासाठी, प्रवेशापूर्वी उद्देशाचे विधान द्यावे लागते, त्याला SOP असेही म्हणतात. हे लिहिताना काळजी घ्या आणि सर्वोत्तम SOP लिहा.
-एकंदरीत, त्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला वैध कारणे द्यावी लागतील,
-ज्यामुळे निवड समिती प्रभावित होईल. म्हणूनच एक चांगला SOP लिहा. यापूर्वी परदेशात शिकलेल्यांचा सल्ला घ्या.
ही बातमी देखील वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI