CBSE विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुढील वर्षापासून 10वी, 12वीची परीक्षा एकदाच होणार
CBSE Board : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) पुढील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकदाच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
CBSE Board Exam : सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)पुढील शैक्षणिक सत्रापासून एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा एकदाच घेतल्या जाणार आहेत. यावर्षी देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे जे विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे एका परीक्षेला बसू शकले नाहीत, त्यांचे गुण दुसऱ्या परीक्षेच्या आधारे मोजले जाणार जातील. मात्र सीबीएसई आता हे धोरण पुढील वर्षीसाठी रद्द केलं आहे.
सीबीएसई बोर्डाची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आली. तर टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळांकडून निवेदन मिळाल्यानंतर बोर्डाने एकच परीक्षा पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अधिक माहिती देत सांगितले की, सीबीएसईने दोन टर्म परीक्षांचे स्वरूप यापुढे सुरू ठेवण्याची घोषणा केली नव्हती. त्यामुळे पुढील वर्षीपासून परीक्षा दोन टर्मच्या ऐवजी एकाच वेळी घेण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील वर्षापासून सीबीएसई बोर्डाची परीक्षा जुना पॅटर्ननुसार होणार आहे.
कोरोनामुळे घेण्यात आला निर्णय
कोरोना निर्बंध हटल्यानंतर आता पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. CBSE कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मागील परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आलं.
अभ्यासक्रमात कपात नाही
सीबीएसई बोर्डाने यापुढे अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे, जी यापुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत नवीन 949 कोरोना रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू
- Indigo Flight : हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग, अन्...
- India Post Recruitment 2022 : भारतील टपाल विभागात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती, आठवी पास करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI