India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती, आठवी पास करा अर्ज
Postal Department Recruitment 2022 : भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्रमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
India Post Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्रमध्ये भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 09 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 09 मे 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
रिक्त पदांची संख्या
मेकॅनिक : 5 पदे
इलेक्ट्रिशियन : 2 पदे
टायर मॅन : 1 पोस्ट
लोहार : 1 पद
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छुक उमेदवारांनी सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतील संबंधित विभागामधील प्रमाणपत्रासह आठवी उत्तीर्ण किंवा संबंधित विभागामध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मेकॅनिक पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराकडे अवजड वाहनांसाठीचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पात्रता आणि स्पर्धात्मक ट्रेड चाचणीच्या आधारे केली जाईल.
पगार
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900 रुपये वेतन दिले जाईल.
अर्जाची प्रक्रिया
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी, उमेदवारांनी 09 मे 2022 पर्यंत आपला अर्ज 'वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018' या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी उमेदवार indiapost.gov.in या वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी
- Eastern Railway Vacancy 2022 : आता परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या तपशील
- Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेच्या 'या' विभागासाठी मेगा भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha