Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत नवीन 949 कोरोना रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1 हजार 7 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 191 इतकी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 191 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 810 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 473 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 7 हजार रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.26 टक्के इतका झाला आहे.
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 6 लाख 66 हजार 660 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 30 लाख 62 हजार 546 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
COVID-19 | India reports 949 fresh cases, 810 recoveries and 6 deaths in the last 24 hours. Active cases 11,191
— ANI (@ANI) April 15, 2022
Daily positivity rate (0.26%) pic.twitter.com/DQkCXm95Hd
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- India Post Recruitment 2022 : भारतील टपाल विभागात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती, आठवी पास करा अर्ज
- Indigo Flight : हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग, अन्...
- South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे 306 हून अधिक लोकांचा मृत्यू
- Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला दणका? पूल उडवून रशियन सैन्याचा ताफा नष्ट केल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha