Crime News : मिस्ड कॉलमुळे जडलं प्रेम, तीन पोरांच्या आईनं प्रियकरासोबत कट रचला, पतीचा काटा काढला
Crime News : एका मिस्ड कॉलमुळे प्रेम जडलं, तीन पोरांच्या आईनं प्रियकरासोबत कट रचून पतीला यमसदनी धाडलं.
Crime News : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात ना, हे वाक्य कधीकधी अगदी तंतोतंत खरं वाटतं. या वाक्याला साजेशी एक घटना नुकतीच बिहारच्या (Bihar News) मोतिहारीमध्ये (Motihari News) घडली आहे. या घटनेनं सध्या खळबळ उडाली आहे. तीन मुलांच्या आईनं परदेशातून प्रियकरासह परतलेल्या पतीची हत्या केली. प्रियकरासोबत मिळून तिनं पतीची हत्या केली. पण या घटनेतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, फक्त एका मिस्ड कॉलमुळे तीन मुलांची आई असलेली ही महिला एका तरुणाच्या प्रेमात पडलेली. दोघांनी आपल्या प्रेमासाठी चक्क तिच्या पतीला संपवण्याचं ठरवलं आणि अति भयंकर पाऊल उचललं.
दोघांमध्ये बोलणं सुरू झालं, पाहता पाहता ती त्याच्या प्रेमात पडली. दोघांमधील प्रेम एवढं वाढलं की, दोघांनी एकत्र आणाभाका घेतल्या. पण त्या दोघांमध्ये एक अडसर होता, तो म्हणजे, महिलेचा पती. दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. मिस्ड कॉलच्या माध्यमातून तरुणाच्या प्रेमात पडलेल्या महिलेनं प्रेयसीसोबत राहण्यासाठी हे भयंकर पाऊल उचललं. मात्र, त्याच्या सर्व युक्त्या निष्फळ ठरल्या, अखेर ती महिला आणि तिचा प्रियकर दोघांनाही पोलिसांनी पकडलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
परदेशातून परतलेल्या व्यक्तीची 4 ऑगस्ट रोजी हत्या, पोलिसांकडून आधीच सुरू होता शोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीची 4 ऑगस्ट रोजी हत्या झाली होती. घोडासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आफताब नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ही व्यक्ती सौदी अरेबियात राहत होती आणि नोकरी करत होती. साधारणतः दहा वर्षांपूर्वी त्याचा नाजनीन नावाच्या मुलीशी विवाह झाला होता. दोघांनाही तीन मुलं होती. आफताब दोन वर्ष कामानिमित्त घराबाहेर राहून पैसे कमवत असे. दरम्यान, सुमारे वर्षभरापूर्वी पत्नीच्या मोबाईलवर रोहित नावाच्या मुलाचा मिस कॉल आला आणि त्यानंतर त्या तरुणाशी तिचं बोलणं सुरू झालं.
मिस्ड कॉलमुळे तीन मुलांच्या आई पडली प्रेमात
जसजसं दोघांमधील बोलणं वाढत गेलं, तसतसे दोघेही प्रेमात पडले आणि एकमेकांना भेटू लागले. त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. या घटनेनंतर सुमारे तीन-चार महिन्यांनी महिलेचा पती त्याच्या गावी आला आणि तिथे राहू लागला. पतीच्या घरी राहिल्यामुळे महिलेला प्रियकराला भेटण्यात अडचण येऊ लागली. यानंतर महिलेनं प्रियकरासह पतीला मार्गावरून दूर करण्याचा कट रचला.
प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट
दोघांनी पतीला संपवण्याचा कट रचला. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी तरुणानं महिलेच्या पतीला काहीतरी बहाणा काढून भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर स्कॉर्पिओमधून घोडासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगाहा बँक टोला येथे नेलं. तिथे चाकूनं वार करुन त्याचा चेहरा दगडानं ठेचला आणि त्याची निघृण हत्या केली. दरम्यान, ग्रामस्थ तिथे जमा झाले, रोहितचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले, मात्र रोहितला ग्रामस्थांनी पकडले. यानंतर गावकऱ्यांनी रोहितला पकडून आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवलं, पण चौकशी सुरूच ठेवली. त्यानंतर तांत्रिक संशोधन केल्यानंतर पोलिसांना मृत आफताबची पत्नी नाजनीन हिचा या हत्येमागे हात असल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :