एक्स्प्लोर

Girish Mahajan : आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात प्रवेश करण्यासाठी फोन केला होता. जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश देखील झाला होता. मात्र त्याबाबत घोषणा झालीच नाही, मी भाजप प्रवेशाच्या विषयावर आता फुली मारली आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणत सारवासारव केली. तर एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर खिल्ली उडवणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आता एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले होते. तर एकनाथ खडसे म्हणतात भाजपात आलो. पण ते भाजपात आले याबाबत मला माहिती नाही. मलाही समजत नाही एकनाथ खडसे नेमकं कुठे आहेत? असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला होता. 

भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन : गिरीश महाजन 

आता एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट केल्यानंतर गिरीश महाजन म्हटले की, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहित नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर, एकनाथ खडसे यांनी माझ्याबाबत 'एबीपी'च्या माझा कट्ट्यावर जे काही बोलले आहेत. त्याला आपणही माझा कट्ट्यावर जाऊन उत्तर देणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

तर, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. 

आणखी वाचा 

Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget