Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Sanjay Raut : आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
नाशिक : ठाण्यातील (Thane) शिवसेनेचे दिवंगत नेते, आनंद दिघे (Anand Dighe) यांचं 'आनंदाश्रम' (Anand Ashram) हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे. या आनंद आश्रमाच्या एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होते. मात्र, शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारे आहेत. व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो. त्या वास्तूमध्ये आम्ही धिंगाणा पाहिला. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? एक हंटर तिथे लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
या प्रकरणाची चौकशी व्हावी
ते पुढे म्हणाले की, आनंद दिघे असे वागणाऱ्यांचं समर्थन करत नव्हते. आनंद दिघे यांना ते गुरू मानत असतील तर अशा प्रकारे त्यांनी केली नसती. लुटीच्या पैशातून असे प्रकार केले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री आहेत म्हणून कारवाई करत नाही का?
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून नियमांचा भंग केल्याचं बोललं जात आहे, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई झाली पाहिजे. ते उपमुख्यमंत्री आहेत म्हणून कारवाई करत नाही का? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या