(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करण्याचं काम केलं आहे.
धाराशिव : देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून महाराष्ट्रात घरोघरी, गावोगावी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतो. मुंबईत मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जनही झाले आहे. दीड दिवसांच्या, 5 दिवसांच्या, 7 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले असून आता 10 दिवसांनंतर सर्वत्र गणपती (Ganpati) बाप्पांना भावूक होऊन गणेशभक्त निरोप देतील. मात्र, सध्या कर्नाटकमधील एका गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान तणावाची परस्थिती उद्भवल्याने पोलिसांनी गणपती बाप्पांची मूर्तीच स्वत:च्या ताब्यात घेतली होती. त्यावरुन, आता काँग्रेस विरोधकांनी कर्नाटक सरकारला लक्ष्य केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही कर्नाटकातील गणेश मूर्तींचा संदर्भ देत शिवरायांचा पुतळ्याचं राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला आहे. तसेच, नाव न घेता राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुनही काँग्रेसला (Congress) लक्ष्य केलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करण्याचं काम केलं आहे. कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला अटक करण्या काम काँग्रेस सरकारने केलंय. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत हे असं करता तुम्ही, कुठे फेडणार हे पाप, अशा शब्दात कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना लक्ष्य केलं. तसेच, राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून राजकारण केलं गेलं. मात्र, कर्नाटकमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींनाच अटक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्याती घटना
कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत अगोदर हाणामारी झाली, त्यानतंर दगडफेक आणि जाळपोळीची घटन घडल्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा फौजफाटा उभारला. पोलिसांनी काहींना अटक केली असून दरम्यान विसर्जन मिरवणुकीतील गणेश बाप्पांची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात आली होती. त्यावरुन, आता कर्नाटकातील काँग्रेस सरकावर भाजप व सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याच, अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, कर्नाटकमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटीझन्स आपली मतं व्यक्त करताना दिसून येतात.
CM शिंदेंचा राहुल गांधींवरही निशाणा
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विदेशात भारतातील आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरूनही एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करता, ह्या काँग्रेसवाल्यांना आता घरी पाठवण्याचे कामे माझ्या बहिणी करणार असल्याचं त्यांनी परंडा येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले.
हेही वाचा
विधानसभा निवडणूक कामकाजास शाळेचा नकार; पोलिसांत गुन्हा दाखल, तलाठ्यानं दिली फिर्याद