एक्स्प्लोर

समुद्रकिनारा स्वच्छ करताना विदेशी दाम्पत्याला आढळली जुन्या नोटांनी भरलेली बॅग; 57 हजारांची रोकड पोलीस स्थानकात जमा

Vasai News: समुद्रकिनारा स्वच्छ करताना विदेशी दाम्पत्याला सापडल्या 57 हजारांच्या जुन्या नोटा. दाम्पत्याची वसईच्या भूईगांव पोलीस स्थानकात धाव.

Vasai News: वसईत (Vasai Crime News) एका दाम्पत्याला समुद्रकिनारा स्वच्छ करताना तब्बल 57 हजारांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. वसईतील भूईगांव समुद्रकिनारा स्वच्छ करताना हंगेरी देशातील राहणाऱ्या दोन विदेशी नागरीकांना एक बॅग आढळली. संशय आल्यानं त्यांनी जवळ जाऊन ती बॅग पाहिली, तर त्या बॅगेत त्यांना काही जुन्या चलनी नोटा आढळून आल्या. त्यांनी त्या नोटा तात्काळ वसईच्या भूईगांव पोलीस स्थानकात (Bhuigaon Police Station) जमा केल्या आहेत. 

रविवारी (11 डिसेंबर) वसईच्या गिरीज येथे राहणारं एक दाम्पत्य आपल्या दोन लहानमुलांसह वसईच्या भूईगांव समुद्रकिनाऱ्यावर आलं होतं. लिजबेन फराव आणि त्यांची पत्नी झायनो फराव आणि त्यांची दोन लहान मुलं असे चौघे मिळून सकाळी वसईजवळचं भूईगांव समुद्रकिनारा स्वच्छ करत होते. समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना त्यांना एक बॅग आढळून आली. संशय आल्यानं फराव दाम्पत्यानं जवळजाऊन बॅगेची पाहाणी केली. त्यावेळी त्यांना बॅगेत थोडी थोडकी नाहीतर तब्बल 57 हजारांची रोकड आढळून आली. पण या सर्व नोटा जुन्या होत्या. ती बॅग घेऊन या दाम्पत्यानं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं. 


समुद्रकिनारा स्वच्छ करताना विदेशी दाम्पत्याला आढळली जुन्या नोटांनी भरलेली बॅग; 57 हजारांची रोकड पोलीस स्थानकात जमा

फराव दाम्पत्यानं पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना त्यांना एक बॅग दिसली. त्यांनी ती बॅग उघडली. तर त्या बॅगेत 57 हजारांच्या जुन्या नोटा सापडल्या. यात हजार रुपयाच्या तीन नोटा तर पाचशे रुपयाच्या 108 जुन्या नोटा होत्या. नोटबंदीनंतर जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्या आहेत. दाम्पत्यानं त्या नोटा वसईच्या भूईगांव पोलीस चौकीत जमा केल्या आहेत. लिजबेन आणि त्यांची पत्नी झायनो हे दोघे मुळचे हंगेरी या देशातील नागरीक आहेत. ते वसईमध्ये गिरीज येथे वास्तव करत असून मागील सहा वर्षांपासून हे दाम्पत्य वसई-विरारमधील बीच स्वच्छ करत आहेत. आतापर्यंत विविध एनजीओ विद्यार्थी, कॉर्पोरेटर यांच्या माध्यमातून बीच स्वच्छता मोहीमही घेतली आहे. तसेच आतापर्यंत 700 टन प्लास्टिक समुद्रकिनाऱ्यावरुन उचललं आहे.

नोटबंदीनंतर राहिलेल्या या जुन्या नोटा कुणीतरी बॅगेसहित समुद्रात फेकल्या असतील आणि समुद्राच्या प्रवाहात ती बॅग भूईगांव समुद्रकिनाऱ्यावर लागली, असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. वसई पोलिसांनी पैसे जमा करुन, जुन्या नोटांबाबत तपास सुरु केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Crime:  इंस्टाग्रामवर ओळख वाढवायचा, भेटायला बोलावून राईडच्या बहाण्यानं बाईक चोरायचा, डोंबिवली पोलिसांनी 'असं' पकडलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget