Ahmednagar-Beed Railway : बहुचर्चित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चोरी; एक कोटी रुपयांचे वायर लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल
Ahmednagar-Beed Railway : या प्रकरणी अहमदनगर येथील रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Ahmednagar-Beed Railway : बहुचर्चित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चोरी; एक कोटी रुपयांचे वायर लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल Theft on Ahmednagar Beed Parli railway line One crore wire theft Ahmednagar-Beed Railway : बहुचर्चित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चोरी; एक कोटी रुपयांचे वायर लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/24/83bab6f3386a5627f644b4e30c88f7921695550246987737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : बहुचर्चित अहमदनगर-बीड या रेल्वे (Ahmednagar-Beed Railway) मार्गाचे काम सध्या सुरू आहे. याच मार्गावर अहमदनगर (Ahmednagar) पासून ते अमळनेरपर्यंत रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम देखील करण्यात येत आहे. मात्र, अज्ञात चोरट्यांनी हे काम सुरू असताना अंदाज 91 लाख 56 हजार रुपयांचे रेल्वेची ओव्हरहेड वायर चोरून नेली आहे. त्यामुळे या प्रकरणी अहमदनगर येथील रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून आरोपींचा शोध देखील घेण्यात येत आहे.
अहमदनगर- आष्टी-बीड रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या बरोबर रेल्वेच्या विद्युतीकरणाचेही काम सुरू आहे. त्यासाठी अहमदनगर -आष्टी आणि त्यापुढे अंमळनेरपर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठीच्या कामाचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने विद्युतीकरणासाठी अपार इंडस्ट्रीज (सिल्वासा, गुजरात) येथून 48 ओव्हर हेड वायरचे ड्रम आणले होते. त्यातील 7 ड्रम हे चोरी गेल्याचे आढळून आले. यासंदर्भात या कंपनीचे सुपरवायझर रविंदर दलाल यांनी ही बाब कळताच अहमदनगर येथील रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या वायरची किंमत 91 लाख 56 हजार इतकी आहे.
दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास सुरु केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कोमल देओल यांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी केली. त्यानंतर अंमळनेर पोलिसात तक्रार दाखल करून पाटोदा उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यातील पथकाकडून तपास सुरु...
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची मागणी केली जात आहे. यासाठी अनेक आंदोलन झाले. विशेष म्हणजे हा मुद्दा राजकीय बनल्याने प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा कायम महत्वाच्या स्थानी राहिला आहे. शेवटी अहमदनगर-बीड-परळी रेल्वेसाठी सरकारने मान्यता देत कामाला सुरवात केली आहे. तर याच मार्गावर अहमदनगर पासून ते अमळनेरपर्यंत रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम देखील करण्यात येत आहे. मात्र, काही अज्ञात चोरांनी चक्क 91 लाख 56 हजार रुपयांचे रेल्वेची ओव्हरहेड वायर चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून रेल्वे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या चोरीचा तपास करण्यासाठी पुणे, कल्याण, मुंबई, सोलापूर, पनवेल विभागाची तपास पथके तयार करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)