एक्स्प्लोर

Ashti Ahmednagar Line : नगर-आष्टी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, आष्टी-नगर डेमू रेल्वेला हिरवा झेंडा

New Ashti Ahmednagar New Line : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा आजपासून सुरु झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

New Ashti Ahmednagar New Railway Line : बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा आजपासून सुरु झाली आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली. 

अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे बीडवासीयांचं लक्ष लागले होतं. त्यानंतर आज बीडवासीयांचे स्वप्न अखेर पूण झालं आहे, असं म्हणावं लागेल.

या 261 किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या 67 किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हावासीयांच्या स्वप्नपूर्तीकडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. अहमदनगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी आज धावली. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत केला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी त्यांच्यासमोर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

Ashti Ahmednagar Line : नगर-आष्टी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, आष्टी-नगर डेमू रेल्वेला हिरवा झेंडा

आष्टी-नगर रेल्वे मार्गामुळे उद्योगधंद्याला चालना मिळणार

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गामुळे व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 

पाहा व्हिडीओ : आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा

बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं अखेर उद्घाटन

नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा विषय कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अनेक वेळा निवडणुकीवेळी हा मुद्दा चर्चेत आला मात्र, आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या मार्गावर रेल्वे धावण्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं  मोठं योगदान आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतत्पत; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतत्पत; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतत्पत; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतत्पत; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांची एमएच 23 BG 2231 गाडी, सीआयडीच्या कार्यालयात शिरण्यापूर्वी काय काय घडलं?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांची एमएच 23 BG 2231 गाडी, सीआयडीच्या कार्यालयात शिरण्यापूर्वी काय काय घडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड सीआयडीला शरण, आता सुरेश धस यांचं पुढचं पाऊल, म्हणाले, आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा!
वाल्मिक कराड सीआयडीला शरण, आता सुरेश धस यांचं पुढचं पाऊल, म्हणाले, आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा!
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Embed widget